शहराध्यक्षपदी सौरभ देशमुख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:30 IST2021-02-14T04:30:05+5:302021-02-14T04:30:05+5:30
उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीच्या शहराध्यक्षपदी सौरभ देशमुख यांची फेरनिवड झाली. ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश ...

शहराध्यक्षपदी सौरभ देशमुख
उस्मानाबाद : राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीच्या शहराध्यक्षपदी सौरभ देशमुख यांची फेरनिवड झाली. ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.यावेळी माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, रायुकाँ जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग गोरे, न. प. गटनेते गणेश खोचरे, आयाज शेख, सचिन तावडे, प्रदेश युवक सरचिटणीस मिनिल काकड़े माजी जि. प. सदस्य मधुकर मोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
हायमस्ट दिवे सुरू करण्याची मागणी
खामसवाडी : कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील मागासवर्गीय वस्तीतील हायमस्ट दिवे मागील सहा महिन्यापासून बंद आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून, अंधारामुळे चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. याबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीला वारंवार निवेदने दिली. परंतु, ग्रामपंचायत याकडे डोळेझाक करीत आहे. हे दिवे बसविण्यासाठी पंधरा लाखांचा खर्च करण्यात आला असून, हे दिवे त्वरित सुरू करावेत, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य शंकर तांदळे व ग्रामस्थांनी केली आहे.
उपाध्यक्षपदी इनामदार यांची नियुक्ती
मुरुम : आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं सामाजिक न्याय संघटना उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील ॲड. एस. पी. इनामदार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष नीरज सिंह आणि प्रदेशाध्यक्ष अनिल रामदास कोंडविलकर, राष्ट्रीय युवा अध्यक्ष ब्रजेस पाठक, जिल्हाध्यक्ष औड. एम. व्ही. जाधव आदींनी त्यांना नियुक्तीपत्र दिले.
‘त्या’ कर्मचाऱ्यांना मुंबईला पाठवू नका
भूम : येथील आगारातील काही वाहक व चालक हे मुंबई येथे कर्तव्यास गेले असता त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पुन्हा मुंबई येथे कर्तव्यावर पाठवू नये, अशी मागणी एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक शाखेने केली आहे. या निवेदनावर अध्यक्ष, उपाध्यक्ष व कर्मचारी यांच्या साह्या आहेत.