सरपंच, सदस्यांचा पिंपळा येथे सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST2021-03-04T05:00:39+5:302021-03-04T05:00:39+5:30
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु.) ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व नूतन सदस्याचा राष्ट्रीय चर्मकार समाज संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष ...

सरपंच, सदस्यांचा पिंपळा येथे सत्कार
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील पिंपळा (बु.) ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व नूतन सदस्याचा राष्ट्रीय चर्मकार समाज संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष पांडुरंग म्हेत्रे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पिंपळा (बु.) ग्रामपंचायतीच्या ८ जागा बिनविरोध निघाल्याने येथील केवळ एका जागेसाठी निवडणूक झाली. यात बाळू शिरसट हे विजयी झाले. सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी तुकाराम चव्हाण होते. या वेळी सरपंच गीता वाघमोडे, उपसरपंच विजय जाधव, सदस्य सोमनाथ मोरे, दयानंद चव्हाण, संग्रामराजे पांढरे, पप्पू चौगुले, बाळू शिरसट, राजेंद्र जाधव, योगेश गवळी आदींचा या वेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास ॲड. गजानन चौगुले, शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, बालाजी चुंगे, बालाजी खराबे, विनोद चव्हाण, राजकुमार चुंगे, भीमसेन धोतरकर, प्रवीण चुंगे, सीताराम पाटील, विकास वाघमोडे, बबन जाधव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन लक्ष्मण चौगुले यांनी केले, गणेश चौगुले यांनी आभार मानले.