संजय मुंदडा यांचा वाढदिवस उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:31 IST2021-04-17T04:31:59+5:302021-04-17T04:31:59+5:30

वाढदिवसानिमित्त कळंब शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंदडा यांचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सत्कार केला. न. प. मध्ये अधिकारी, कर्मचारी यांनी मुंदडा ...

Sanjay Mundada's birthday in excitement | संजय मुंदडा यांचा वाढदिवस उत्साहात

संजय मुंदडा यांचा वाढदिवस उत्साहात

वाढदिवसानिमित्त कळंब शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुंदडा यांचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सत्कार केला. न. प. मध्ये अधिकारी, कर्मचारी यांनी मुंदडा यांचे अभीष्टचिंतन केले. विविध पक्ष, संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. सामान्य नागरिक विशेषतः युवकांनी शहरात विविध प्रभागात उपनगराध्यक्ष मुंदडा यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. कळंबकरांनी उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी देऊन माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. मागील चार वर्षात विविध कामांच्या माध्यमातून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न केला व आगामी काळातही शहरात जास्तीत जास्त निधी आणून शहराचा कायापालट करू, असे प्रतिपादन उपनगराध्यक्ष मुंदडा यांनी सत्काराला उत्तर देताना दिले.

कॅप्शन - कळंबचे उपनगराध्यक्ष संजय मुंदडा यांचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त सत्कार केला. यावेळी नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, सागर मुंडे, प्रभारी उपनगराध्यक्ष अमर गायकवाड, शकील काझी महेश पुरी, बप्पा चोंदे, काकासाहेब पुरी आदी उपस्थित होते.

Web Title: Sanjay Mundada's birthday in excitement