मुलांत संजय, मुलीत रोहिणीने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:35 IST2021-09-27T04:35:56+5:302021-09-27T04:35:56+5:30

उमरगा : ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी व येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने ‘आझादी अमृतमहोत्सवानिमित्त’ महाविद्यालयाच्या मैदानावर २ किमी. ...

Sanjay in boys, Rohini in girls | मुलांत संजय, मुलीत रोहिणीने मारली बाजी

मुलांत संजय, मुलीत रोहिणीने मारली बाजी

उमरगा : ५३ महाराष्ट्र बटालियन एनसीसी व येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने ‘आझादी अमृतमहोत्सवानिमित्त’ महाविद्यालयाच्या मैदानावर २ किमी. धावण्याची स्पर्धा शनिवारी घेण्यात आली. या मुलांमध्ये संजय चव्हाण, तर मुलींत रोहिणी सूर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक मिळविला.

स्पर्धेचे उदघाटन प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, उपप्राचार्य डॉ. संजय अस्वले, डॉ . विलास इंगळे, डॉ . धनाजी थोरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. या स्पर्धेमध्ये ६३ मुले व १७ मुलींनी सहभाग नोंदविला. प्रारंभी एनसीसी लेफ्टनंट प्रा. ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले यांनी स्पर्धेचे नियम सांगितले. या स्पर्धेत मुलांमध्ये संजय चव्हाण, विक्रांत गायकवाड व गणेश सूर्यवंशी, तर मुलींमधून रोहिणी सूर्यवंशी, कल्पना कोळी व निकिता बेळंबे या कैडेटनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविले. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी प्रा. विजय पवार, प्रा. गोविंद गायकवाड, डॉ. डी. व्ही. पडोळे, डॉ. एस. पी. इंगळे, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. बी. जी. माने, डॉ. व्ही. डी. देवरकर, डॉ. व्ही. एन. हिस्सल, प्रा. एस. ई. बिराजदार, डॉ. एस. एल. राठोड, प्रा. एस. पी. पसरकल्ले, डॉ. सी. व्ही. पवार, डॉ. आशा शिंदे, डॉ. पार्वती सावंत, प्रा. रेश्मा नितनवरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन प्रा. शेखर दाडगे यांनी केले, तर आभार प्रा. राजू सूर्यवंशी यानी मानले.

Web Title: Sanjay in boys, Rohini in girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.