निबंध स्पर्धेत समृध्दी, राजसिंह सर्वप्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:00 IST2021-02-21T05:00:21+5:302021-02-21T05:00:21+5:30

पंचायत समितीतील उपक्रमाची पाहणी भूम : येथील पंचायत समितीत राबविण्यात येत असलेल्या ‘सुंदर माझे कार्यालय’ उपक्रमाची मुख्य कार्यकारी अधिकारी ...

Samrudhi, Rajsingh first in essay competition | निबंध स्पर्धेत समृध्दी, राजसिंह सर्वप्रथम

निबंध स्पर्धेत समृध्दी, राजसिंह सर्वप्रथम

पंचायत समितीतील उपक्रमाची पाहणी

भूम : येथील पंचायत समितीत राबविण्यात येत असलेल्या ‘सुंदर माझे कार्यालय’ उपक्रमाची मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी पाहणी केली. या उपक्रमांतर्गत कार्यालयाला रंगरंगोटी तसेच वृक्षारोपण करण्यात आले आहे. यावेळी डॉ. फड यांनी आढावा बैठकही घेतली. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नवाळे, तालुका संपर्क अधिकारी डॉ. नामदेव अघाव, गटविकास अधिकारी बी. आर. ढवळशंख, गटशिक्षणाधिकारी सुनील गायकवाड आदी उपस्थित होते.

नाहरकत मिळत नसल्याची तक्रार

येरमाळा : माविमकडून उमेदकडे जाण्यासाठी बचत गटांना नाहरकत देण्याबाबत माविमच्या जिल्हा समन्वयकांना आदेश द्यावेत, अशी मागणी येरमाळा, मलकापूर येथील माविम बचतगटाच्या महिलांनी जिल्हा प्रकल्प संचालक व जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मलकापूर येथील स्वप्नपूर्ती, जिजाऊ, महालक्ष्मी, येडेश्वरी, कृतिका बचत गट, तसेच येरमाळा येथील अन्नपूर्णा बचत गटांस नाहरकत मिळत नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. याबाबत मराविमच्या जिल्हा समन्वयक शोभा कुलकर्णी यांना संपर्क साधला असता, त्यांनी सध्या तालुका समन्वयक रजेवर आहेत, ते हजर होताच गटांना नाहरकत देऊ, असे सांगितले.

विद्यार्थिनीने साकारली किल्ल्याची प्रतिकृती

उस्मानाबाद : शहरातील वैष्णवी सोनसाळे या अभियांत्रिकीच्या विद्यार्थिनीने रायगड किल्ल्याची प्रतिकृती साकारुन छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन केले. शहरातील काळा मारुती चौक येथे शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या पूर्वसंध्येला गुरुवारी ही प्रतिकृती तयार करण्यात आली. वैष्णवी ही उस्मानाबाद शहरातील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ही कलाकृतीे गुरुवारी दिवसभरात अनेक शिवप्रेमींनी पाहून कौतुक केले.

सावरगावात ‘सुंदर माझे गाव’ अभियान

तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे ‘माझं गाव, सुंदर गाव’ अभियानांतर्गत ग्रामस्वच्छता मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत गावातील सर्व शासकीय कार्यालयांची स्वच्छता, रंगरंगोटी, अभिलेखे अद्ययावतीकरण आदी बाबी पूर्ण करण्यात आल्या. यावेळी सरपंच रामेश्वर तोडकरी, उपसरपंच आनंद बोबडे, सचिन मगर, ग्रामविकास अधिकारी श्रीशैल्य कोठे, सचिन तानवडे, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

वाहने घेऊन जाण्याचे आवाहन

लोहारा : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघात, गुन्ह्यांत जप्त केलेली वाहने मागील अनेक वर्षांपासून ठाण्यात धूळ खात पडलेली आहेत. ही वाहने संबंधित वाहन मालकांनी घेऊन जावीत, असे आवाहन पोलीस निरीक्षक धरमसिंह चव्हाण यांनी केले आहे. येथे अपघातातील ४८ दुचाकी व चार चारचाकी वाहने अनेक वर्षांपासून पडून आहेत. तसेच बेवारस आढळून आलेली वाहनेही आहेत. येत्या सात दिवसांत संबंधितांनी वाहने न नेल्यास त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया केली जाणार असल्याचे पोनि चव्हाण यांनी म्हटले आहे.

पथनाट्याद्वारे केली जनजागृती

नळदुर्ग : येथील बसस्थानकशेजारील अक्कलकोट रोडवर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी व वाहने चालविताना घ्यावयाची काळजी याची जनजागृती करण्यासाठी पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते. दोन वाहनांचा अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी काय परिस्थिती निर्माण होते, यावर आधारित आशुतोष नाटकर करुणशील समिती, सोलापूर व औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर येथील विद्यार्थ्यांनी हे पथनाट्य सादर केले. यावेळी महामार्ग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोउपनि हनुमंत कवले यांनीही रस्ता सुरक्षाबाबत विविध नियमांची माहिती दिली.

माधवराव पाटील यांची नियुक्ती

(सिंगल फटो : बालाजी बिराजदार २०)

लोहारा : तालुक्यातील उदतपूर येथील माजी सरपंच माधवराव पाटील यांची अहमदनगर येथील निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या राज्य कार्यकारिणीवर प्रमुख संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष आबासाहेब मोरे यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीचे पत्र दिले. या नियुक्तीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

----------

कारवाईची मागणी

भूम : राज्यात पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढत असताना भूम शहर व तालुक्यात मात्र नियम पाळण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने कारवाईची गरज व्यक्त होत आहे.

ज्वारीचे नुकसान

(फोटो : अरूण देशमुख २०)

भूम : १७ फेब्रुवारीच्या मध्यरात्री झालेल्या पावसाने काही भागात काढणीला आलेली ज्वारी भुईसपाट झाली, तर काही भागात वारे अधिक असल्याने ज्वारीसोबत गहू, हरभरा या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसला.

(फोटो : गुणवंत जाधवर २०)

पदाधिकाऱ्यांचा सत्कार

उमरगा : मातोळा येथे बिनविरोध निवड झालेल्या सरपंच विलास गिरी व उपसरपंच अर्जुन भोसले यांचा जि. प. अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नानाराव भोसले, विजयकुमार सोनवणे, जनार्धन पाटील आदी उपस्थित होते.

केमवाडीत परसबाग

तामलवाडी : केमवाडी येथे अंगणवाडी क्र. ८०९ मध्ये परसबागेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सरपंच छाया डोलारे, उपसरपंच गौरीशंकर नकाते, ग्रामविकास अधिकारी श्रीशैल्य कोठे, अंगणवाडी कार्यकर्ती उज्वला फंड, मदतनीस माधुरी काशीद, शिवाजी फंड, शंकर कोळी, वली अहमद शेख आदी उपस्थित होते.

Web Title: Samrudhi, Rajsingh first in essay competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.