संभाजी ब्रिगेडचा भूममध्ये ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:38 IST2021-02-17T04:38:51+5:302021-02-17T04:38:51+5:30
भूम : इंधन दरवाढ मागे घेण्यासह इतर मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष हनुमान हुंबे यांच्या नेतृत्वाखाली भूम ...

संभाजी ब्रिगेडचा भूममध्ये ठिय्या
भूम : इंधन दरवाढ मागे घेण्यासह इतर मागण्यांसाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष हनुमान हुंबे यांच्या नेतृत्वाखाली भूम येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यात कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळामुळे शेतकरी अगोदरच आर्थिक संकटात असून, यातच महावितरणकडून भरमसाठ वीज बिल देत सक्तीने वसुली करण्यात येत आहे . त्यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण वीज बील माफ करावे, शेतकऱ्यांना सरसकट खरीप विमा द्यावा, इंधन दरवाढ मागे घ्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या. आंदोलनात शहराध्यक्ष अमोल सुरवसे, अविनाश हुंबे, श्रीकांत डंबरे, नागेश तमाचे, रामप्रसाद राऊत, नाना लिमसे, वैभव हुंबे, निखील देशपांडे, रविंद्र हुंबे, उमेश हुंबे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.