संभाजी ब्रिगेडचे लाेहार्यात मुंडण आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST2021-05-07T04:34:42+5:302021-05-07T04:34:42+5:30

राज्य सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले हाेते. परंतु, या निर्णयाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले हाेते. दाेन्ही बाजुंचा ...

Sambhaji Brigade shaves in Lahara | संभाजी ब्रिगेडचे लाेहार्यात मुंडण आंदाेलन

संभाजी ब्रिगेडचे लाेहार्यात मुंडण आंदाेलन

राज्य सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले हाेते. परंतु, या निर्णयाला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले हाेते. दाेन्ही बाजुंचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने हे आरक्षण रद्द केले. न्यायालयाच्या या निर्णयानंतर मराठा समाजातून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली आहे. लाेहारा शहरामध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीने मुंडण आंदाेलन करून नाराजी व्यक्त केली. मराठा समाजाला सरसकट ओबीसी आरक्षण लागू करावे. यासाठी तातडीने मंत्रीमंडळाची बैठक घेऊन निर्णय घ्या, अशी मागणीही त्यांनी केली आहे. मागणीचे हे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना देण्यात आले. निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष शरद पवार, जिल्हा सचिव आशिष पाटील, लोहारा तालुकाध्यक्ष धनराज बिराजदार, बालाजी यादव, महादेव मगर आदी उपस्थित होते.

Web Title: Sambhaji Brigade shaves in Lahara