मुलीची छेड काढल्याने सलमानला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:34 IST2021-08-26T04:34:55+5:302021-08-26T04:34:55+5:30
उस्मानाबाद शहरातील अमृतनगर भागात राहणारा आरोपी सलमान चाँद पठाण हा तेरणा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत ...

मुलीची छेड काढल्याने सलमानला सक्तमजुरी
उस्मानाबाद शहरातील अमृतनगर भागात राहणारा आरोपी सलमान चाँद पठाण हा तेरणा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग करीत होता. १० सप्टेंबर २०१८ रोजी तो तिच्या घराबाहेर थांबून हातवारे करीत होता. ११ रोजी पुन्हा तो घराजवळ येऊन मुलीस बाहेर बोलावू लागला. हा प्रकार मुलीने पालकांना सांगितल्यावर त्यांनी सलमानला पकडून आनंदनगर ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार छेडछाड व ॲट्रॉसिटी कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी करून दोषारोपपत्र सादर केले. २५ ऑगस्ट रोजी यावर अंतिम सुनावणी झाली. पोलिसांनी सादर केलेले पुरावे व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. मखरे यांनी आरोपीला सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.