टेम्पोतून प्राण्यांची निर्दयी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:32 IST2021-05-16T04:32:08+5:302021-05-16T04:32:08+5:30

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील विकास वसंत गाटे व नळदुर्ग येथील अकबर नसीर कुरेशी हे दोघेजण टेम्पोत दाटीवाटीने पशुधन भरून ...

The ruthless transport of animals from the tempo | टेम्पोतून प्राण्यांची निर्दयी वाहतूक

टेम्पोतून प्राण्यांची निर्दयी वाहतूक

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील विकास वसंत गाटे व नळदुर्ग येथील अकबर नसीर कुरेशी हे दोघेजण टेम्पोत दाटीवाटीने पशुधन भरून त्यांची वाहतूक करीत असल्याची माहिती तुळजापूर पोलिसांना प्राप्त झाली होती. याअनुषंगाने मुख्य रस्ता सोडून आडवाटेने जाणाऱ्या या टेम्पोवर पोलिसांच्या पथकाने पाळत ठेवली होती. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हा टेम्पो सिंदफळ मार्गे जात असताना या पथकाने वाहन अडवून त्याची तपासणी केली. तेव्हा त्यात निर्दयीपणे पशुधन कोंबल्याचे आढळून आले. शिवाय, त्यांच्या चारा-पाण्याचीही व्यवस्था केल्याचे या वाहनात दिसून आले आहे. त्यामुळे सरकार पक्षातर्फे कर्मचारी प्रशांत म्हेत्रे यांनी विकास गाटे व अकबर कुरेशी या दोघांविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार तुळजापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: The ruthless transport of animals from the tempo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.