‘एसपी शुगर’चे रोलर पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST2021-07-25T04:27:10+5:302021-07-25T04:27:10+5:30
ढोकी : उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील येथील एस. पी. शुगर ॲण्ड अग्रो या कारखान्याचे रोलर पूजन शनिवारी पाणीपुरवठा ...

‘एसपी शुगर’चे रोलर पूजन
ढोकी : उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील येथील एस. पी. शुगर ॲण्ड अग्रो या कारखान्याचे रोलर पूजन शनिवारी पाणीपुरवठा व सार्वजानिक बांधकाम राज्यमंत्री संजय बसनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील, तर व्यासपीठावर शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी आमदार राहुल मोटे, एस. टी. महामंडळचे माजी अध्यक्ष जीवन गोरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा साक्षणा सलगर, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य गोरे, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, संपत डोके, श्रीधर भवर, तारेख मिर्झा, शंतनू खंदारे, नंदकुमार गवारे, प्रतापसिंह पाटील प्रवीण यादव, सचिन तावडे, नितीन बगल एस. पी. शुगरचे अध्यक्ष सुरेश पाटील, कार्यकारी संचालक समीर पाटील, सरपंच किरण आवटे, राजाभाऊ लोंढे, नाना वाघ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपक मुळूक यांनी केले.