कडकनाथवाडीतील रस्ते झाले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST2021-05-11T04:34:44+5:302021-05-11T04:34:44+5:30
कळंब येथील उपविभागीय अधिकारी यांनी रुग्ण वाढलेल्या गावांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने कडकनाथवाडी गाव सील ...

कडकनाथवाडीतील रस्ते झाले बंद
कळंब येथील उपविभागीय अधिकारी यांनी रुग्ण वाढलेल्या गावांमध्ये प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्या अनुषंगाने कडकनाथवाडी गाव सील केले आहे तर वडजी गाव पूर्णपणे खुले आहे. याठिकाणी मात्र उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे. याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे.
१ जानेवारी ते १० मे या कालावधीमध्ये कडकनाथवाडी गावामध्य कोरोनाचे ५८ रुग्ण सापडले आहेत. उपचार घेऊन ४७ रुग्ण घरी परतले तर ११ रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत तर वडजी येथे एकूण ७२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यापैकी ३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले व ३५ रुग्ण दवाखान्यात उपचार घेत आहेत. याठिकाणी कोरोनाचे नियम पाळले जात नाहीत. सर्व रस्ते रिकामे, सर्वत्र ग्रामस्थांचा वावर खुलेआम सुरुच आहे. या गावांमध्ये ग्रामस्थांची कोरोना तपासणी सुरू केली आहे. तपासणी करण्याचे काम तेरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे सीएचओ डाॅ. दिवाणे करत आहेत.