फड यांनी घेतली आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:32 IST2021-03-19T04:32:05+5:302021-03-19T04:32:05+5:30

वाशी पंचायत समितीमध्ये विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून ‘सुंदर माझे कार्यालय’ या उपक्रमाअंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध कामाची ...

Review meeting chaired by Phad | फड यांनी घेतली आढावा बैठक

फड यांनी घेतली आढावा बैठक

वाशी पंचायत समितीमध्ये विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून ‘सुंदर माझे कार्यालय’ या उपक्रमाअंतर्गत राबवण्यात आलेल्या विविध कामाची पाहणी यावेळी त्यांनी केली. यानंतर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेतली . यामध्ये सन २०१९-२० मध्ये तालुक्यात रमाई आवास योजना, पारधी विकास आवास योजना, प्रधानमंत्री घरकूल आवास योजना व इतर योजनांच्या कामांचा आढावा घेतला. ३१ मार्चपर्यंत सर्व कामे पूर्ण करून घेण्याच्या सूचना त्यांनी कर्मचाऱ्यांना केल्या.

तालुक्यातील झिन्नर व गोजवडा येथील रोजगार हमी योजनेतून झालेल्या रस्त्याची, दसमेगाव येथे पारधी विकास आवास योजनेमधून सुरू असलेल्या घरकुलाची त्यांनी पाहणी केली. यावेळी बांधलेल्या घरावर चिमणी पाखरांसाठी चारा व पाणी ठेवण्याची व्यवस्था करण्याचे आवाहन घरकूल लाभार्थ्यांसह गावकऱ्यांना केले. त्यांच्या समवेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, अनंत कुंभार, जिल्हा कृषी अधिकारी डॉ. तानाजी चेमनशेट्टी, गटविकास अधिकारी विलास खिल्लारे आदी उपस्थित होते.

Web Title: Review meeting chaired by Phad