शिवजयंती संदर्भात घेतलेला निर्णय मागे घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:32 IST2021-02-13T04:32:01+5:302021-02-13T04:32:01+5:30

उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मर्यादित संख्येने साजरी करावी, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. घेतलेला तो ...

Reverse the decision taken regarding Shiva Jayanti | शिवजयंती संदर्भात घेतलेला निर्णय मागे घ्या

शिवजयंती संदर्भात घेतलेला निर्णय मागे घ्या

उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मर्यादित संख्येने साजरी करावी, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. घेतलेला तो निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

राज्यातील आघाडी सरकारने शिवजयंती साजरी करताना मिरवणूक न काढणे, जाहीर प्रबोधनात्मक कार्यक्रम न घेणे अशा जाचक अटींचे निर्णय घेतल्यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमींच्या भावना दुखावलेल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे आपल्या आवाहनास जनतेने मनापासून प्रतिसाद दिला, परंतु २०२१ साल हे जगातील लोकांसाठी आशादायी किरणाने उजळले आहे. नव्हे, तर कोरोनासारख्या जागतिक महामारीला हरवू शकतो, असा आत्मविश्‍वास देणारे ठरले आहे. सद्यपरिस्थितीत राज्यात सर्व व्यवहार, व्यापार, लग्न, धार्मिक कार्य, मंत्र्यांचे दौरे, राजकीय सभा अगदी मुक्तपणे सुरळीत सुरू केले आहेत, तसेच राज्यातील मंत्री, नेते, मोठमोठ्या सभा घेत, आपले कार्यक्रम व्यवस्थित पार पाडीत आहेत. त्यावेळी सरकारला कोरोनाच्या प्रसाराची भीती वाटत नाही, परंतु नेमकी महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या शिवरायांच्या जयंतीच्या उत्सवातच कोरोनाच्या प्रसाराची आपल्याला भीती वाटते, हे अनाकलनीय आहे. सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्ष ॲड.तानाजी चौधरी, जिल्हा सचिव आशिष पाटील, दत्तात्रय कवडे, अतुल गायकवाड, संदीप लाकाळ, आकाश मुंडे, बालाजी नाईकनवरे, रमेश चव्हाण, रामेश्वर बोबडे, आदित्य देशमुख, मनोज लोमटे-पाटील, ॲड.आकाश एडके, शिवदास पवार, रईस शेख, प्रशांत शेळके आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: Reverse the decision taken regarding Shiva Jayanti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.