पारगावात तीन ठिकाणे प्रतिबंधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:32 IST2021-04-08T04:32:49+5:302021-04-08T04:32:49+5:30
पारगाव : येथे कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे प्रशासनाने रुग्ण आढळलेल्या तीन ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र निर्माण केले आहेत. शिवाय गावात ...

पारगावात तीन ठिकाणे प्रतिबंधित
पारगाव : येथे कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे प्रशासनाने रुग्ण आढळलेल्या तीन ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र निर्माण केले आहेत. शिवाय गावात जंतुनाशकाची फवारणी ही करण्यात आली.
सध्या महाराष्ट्रात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. याला आळा घालण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ म्हणून शासनाने कडक निर्बंध घातलेले आहेत. वाशी तालुक्यातील पारगाव येथेही कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. शासनाच्या नियमानुसार पारगाव येथेही ब्रेक द चेन नुसार काही व्यापारी बंद ठेवत आहेत तर काही याकडे दुर्लक्ष करत आहेत. ब्रेक द चैन साठी बंद न ठेवता कडक निर्बंध घालून आस्थापना सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे.
दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आतापर्यंत १८ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने रुग्ण आढळलेला भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून तो भाग सील केला आहे. शिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर पाच कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांची निवासस्थाने प्रतिबंधित करण्यात आली आहेत.
पारगाव ग्रामपंचायतीच्या वतीने बुधवारी गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. यावेळी उपसरपंच कॉ. पंकज चव्हाण, समाधान मोटे, प्रवीण डोके, मनोज औताने, हनुमान मोटे, आर. ए. डोके आदी उपस्थित होते. गावात केलेल्या प्रतिबंधित क्षेत्राला तलाठी एस. एस. बिक्कड, उपसरपंच पंकज चव्हाण, सचिन मोटे, अशोक गायकवाड, सुरेश लाखे आदींनी भेट देऊन पाहणी केली.