रक्तदानाच्या महायज्ञाला उस्मानाबादेत प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:08+5:302021-07-07T04:40:08+5:30
उस्मानाबाद : सध्या राज्यात निर्माण झालेल्या रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर लोकमतने राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी ...

रक्तदानाच्या महायज्ञाला उस्मानाबादेत प्रतिसाद
उस्मानाबाद : सध्या राज्यात निर्माण झालेल्या रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर लोकमतने राज्यभर रक्तदान शिबिरांचे आयोजन केले आहे. या उपक्रमांतर्गत सोमवारी उस्मानाबादेत लोकमत व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास उस्मानाबादकरांनी चांगला प्रतिसाद दिला.
लॉकडाऊन, लसीकरण, बाधित रुग्ण यामुळे रक्तदानावर यावर्षी मर्यादा आल्या आहेत. परिणामी, राज्यातील विविध ब्लड बँकांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात घेऊन लोकमतने पुढाकार घेतला आहे. लोकमतचे संस्थापक-संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलाल दर्डा - बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ते १५ जुलै या कालावधीत राज्यभर रक्तदानाचा महायज्ञ आयोजित केला आहे. याअंतर्गत सोमवारी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. जि.प. अध्यक्षा अस्मिता कांबळे, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, राष्ट्रवादीचे नेते डॉ.प्रतापसिंह पाटील, भाजपचे दत्ता कुलकर्णी, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जि.प. सीईओ राहुल गुप्ता, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, पोलीस उपअधीक्षक मोतीचंद राठोड, शासकीय ब्लड बँकेच्या प्रमुख डॉ. श्रीमती गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील ब्लड बँकेच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या या शिबिरात संजय लिंबराज धोंडगे, रवींद्र वसंत कोरे, दत्तात्रय दिगंबर मस्के, सुनील दत्तात्रय वाकडे, सुवर्णा विश्वास कुलकर्णी, अंजली शिवदर्शन मुरगे, नगरसेवक प्रदीप प्रभाकर मुंडे, मसापचे शाखाध्यक्ष नितीन शिवाजी तावडे, अविनाश अजय सरवदे, असिफ महेबूब सय्यद, मोहसीन दस्तगीर शेख, प्रतापसिंह बबन शेंडगे, विठूबाई वसंतराव क्षीरसागर, विष्णू रामचंद्र उंबरे, विक्रमी रक्तदाते सिद्दिकी मुखीद अहेमद सिद्दीक अहेमद, प्रदीप प्रकाश कुलकर्णी, सचिन किशोर कुलकर्णी, समर्थ सुधाकरराव देशपांडे, माउली कोंडिबा चौरे, राहुल नानासाहेब लोमटे, विश्वजित दयानंद गव्हाणे, योगेश सुरेश फुलसे, दीपक शंकर खोत, ज्योती बाबूराव चव्हाण, सुधाकर प्रभाकर बागल, राजपाल अर्जुन काकडे, पवन मारुती सूर्यवंशी, अजिंक्य भारत धुर्वे यांच्यासह लोकमतचे कर्मचारी व विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी डॉ. अभय शहापूरकर, साहित्यिक राजेंद्र अत्रे, वकील संघाचे अध्यक्ष नितीन भोसले, लक्ष्मण माने, शिवानंद कथले यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.
उद्या कळंब येथे होणार शिबिर...
रक्तदानाचा महायज्ञ या उपक्रमांतर्गत उस्मानाबादनंतर आता ७ जुलै रोजी कळंब शहरात रक्तदान शिबिर होत आहे. येथील पंचायत समितीच्या सभागृहात सकाळी १० वाजेपासून शिबिराला सुरुवात होईल. या शिबिरात कळंब व परिसरातील राष्ट्रीय चर्मकार महासंघ, तलाठी संघटना, ग्रामसेवक युनियन, कृषी सहायक संघटना, रिपब्लिकन सेना, राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभाग, प्राथमिक शिक्षक संघ (थोरात गट), प्राथमिक शिक्षक संघ (पाटील गट), ऑक्सिजन ग्रुप, एनसाई संगणकशास्त्र महाविद्यालय, शिवाई प्रतिष्ठान, जलमंदिर प्रतिष्ठान, दयावान प्रतिष्ठान, रोजगार सेवक युनियन, संगणक परिचालक संघटना, एसटी आगार, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज भक्त परिवार, सराफा असोसिएशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, डी.जी. ग्रुप, लिजंड ग्रुप, स्फूर्ती फाउंडेशन, नाभिक संघटना, लहुजी शक्ती सेना, प्रहार अपंग क्रांती संघटना सहभागी होत आहेत.