थकबाकीमुक्त झालेल्या शेतकऱ्यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST2021-03-07T04:29:33+5:302021-03-07T04:29:33+5:30
खामसवाडी : महावितरणच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कृषी पंप वीज जोडणी अभियानात सहभागी होत थकबाकीमुक्त झालेल्या शेतकऱ्याचा कळंब तालुक्यातील ...

थकबाकीमुक्त झालेल्या शेतकऱ्यांचा सन्मान
खामसवाडी : महावितरणच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या कृषी पंप वीज जोडणी अभियानात सहभागी होत थकबाकीमुक्त झालेल्या शेतकऱ्याचा कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे सत्कार करण्यात आला. येथील शेतकरी शिवशंकर नागनाथ गोरे यांनी अनेक वर्षांपूर्वी शेतातील विद्युत पंपासाठी वीज कनेक्शन घेतले होते. परंतु त्यांच्याकडे अनेक दिवसांपासून वीज भरणा थकला असल्याने त्यांच्याकडे २०२१ पर्यंत ३ लाख ७ हजार ४९५ रुपये एवढी थकबाकी थकली होती. गावातील लाईनमन व वरिष्ठ अधिकारी यांनी गोरे यांना या योजनेचे महत्त्व पटवून दिल्यानंतर त्यांनी एकरकमी सवलतीच्या दरात त्यांनी ८९ हजार १४० रुपये भरणा केला. याबद्दल सरपंच पती संजय कोळी व मोहा सर्कलचे अभियंता हिवर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अभियंता तोंडे, बी. बी. गाढवे, एस. बी. पाटील, जी. एस. अवधूत, के. एस. कोकाटे, लाईनमन पवार, जब्बार शेख, मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटुळे, माजी जि. प. समाजकल्याण सभापती राजाभाऊ शिंदे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.