‘किल्लारी’चे गाळप सुरू करण्याचा बैठकीत ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:19+5:302021-06-20T04:22:19+5:30
उमरगा, लोहारा, औसा, निलंगा कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यावर सध्या शासनाच्या वतीने अवसायक मंडळाची नेमणूक करण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी ...

‘किल्लारी’चे गाळप सुरू करण्याचा बैठकीत ठराव
उमरगा, लोहारा, औसा, निलंगा कार्यक्षेत्र असलेल्या या कारखान्यावर सध्या शासनाच्या वतीने अवसायक मंडळाची नेमणूक करण्यात आली आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी अवसायक तथा जिल्हा उपनिबंधक एस.जे. जाधव होते. अवसायक केशव पाटील यांनी येत्या हंगामात गाळप चालू करण्यासाठी कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्याचा ठराव मांडला. यास सर्व अवसायक मंडळ सदस्य व ऑनलाइन उपस्थित असलेल्या सभासदांनी मान्यता देऊन हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. तसेच हा ठराव शासनाकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे अवसायक विकास हराळकर यांनी सांगितले.
प्रास्ताविक विजयकुमार सोनवणे यांनी केले, तर आभार आर.एस. हेळंबे यांनी मानले. कार्यक्रमास कार्यकारी संचालक तुकाराम पवार, अवसायक व्ही.ए. बाभळसुरे, विकास हराळकर, बाबा पाटील, आर. हेळंबे, विजयकुमार सोनवणे, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी तसेच चारही तालुक्यांतील सभासद श्रीकांत पोफळे, पंकज हराळकर, मोहन माने, हरिकिसन पवार, पंडित गायकवाड, हरिभाऊ जाधव, प्रल्हाद भोसले, विलास पाटील आदी उपस्थित होते.