आरक्षण, धान्य मोफत वाटप करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:24 IST2021-06-06T04:24:40+5:302021-06-06T04:24:40+5:30

कळंब : मराठा समाजाचे आरक्षण तसेच एससी, एसटी प्रवर्गातील नोकरदारांना पदोन्नतीमध्ये आरक्षण, केशरी रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वाटप, आदी ...

Reservation, demand for free distribution of grain | आरक्षण, धान्य मोफत वाटप करण्याची मागणी

आरक्षण, धान्य मोफत वाटप करण्याची मागणी

कळंब : मराठा समाजाचे आरक्षण तसेच एससी, एसटी प्रवर्गातील नोकरदारांना पदोन्नतीमध्ये आरक्षण, केशरी रेशन कार्डधारकांना मोफत धान्य वाटप, आदी मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) च्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले.

याबाबत दिलेल्या निवेदनात नवीन रेशनकार्ड वितरण, भूमिहीन, शेतमजुरांना योजना, कळंब तालुक्यातील ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना वीज, पाणी उपलब्ध करून द्यावे, मागासवर्गीय विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती तात्काळ बँक खात्यात जमा करावी, कोरोना काळातील वीजबिल , घरपट्टी, पाणीपट्टी पूर्णतः माफ करावी, संजय गांधी, श्रावण बाळ या योजनेंतर्गत ५ हजार रुपये दरमहा मानधन देण्यात यावे, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.

या निवेदनावर पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख महावीर गायकवाड, जिल्हाध्यक्ष राजाभाऊ राऊत, उस्मानाबाद तालुकाध्यक्ष संदीपान सरवदे, अविनाश जाधव, सर्जेराव सावंत, निवृत्ती हौसलमल आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Reservation, demand for free distribution of grain