दस्तापूर, भोसगा येथील पदाधिकाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST2021-03-08T04:29:45+5:302021-03-08T04:29:45+5:30
जेवळी : लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथे दस्तापूर व भोसगा येथील ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा पार ...

दस्तापूर, भोसगा येथील पदाधिकाऱ्यांचा सत्कार
जेवळी : लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथे दस्तापूर व भोसगा येथील ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार सोहळा पार पडला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक त्र्यंबक कोकाटे, तर प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई शहर भाजपचे अध्यक्ष दिलीपराव माने, शिवसेना तालुका उपप्रमुख जगन्नाथ पाटील, ज्ञानदेव डोंगरे, सेवानिवृत्त जिल्हा रेशीम उद्योग अधिकारी प्रभाकर मदने, धोंडिराम माडजे उपस्थित होते. यावेळी दोन्ही गावातील सरपंच, उपसरपंच व नूतन सदस्यांचा गुलाबाचे झाड आणि शाल घालून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी दस्तापूर सरपंच छबुबाई गावडे, उपसरपंच सोमनाथ पाटील, भोसगा सरपंच शशिकला गोसावी, उपसरपंच संजय पाटील, माजी सरपंच अल्ताफ पटेल, माजी उपसरपंच गजेंद्र डावरे, सेवानिवृत्त भारतीय सैनिक सुभाष बिराजदार यांच्यासह दोन्ही ग्रामपंचायतींचे नूतन सर्व सदस्य, पॅनलप्रमुख, प्रभाग बिनविरोध निघावे म्हणून माघार घेतलेले गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. जगन्नाथ पाटील यांनी आभार मानले.