रिड टू मी स्टुडंट एडीशन ॲप वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:34 IST2021-02-11T04:34:00+5:302021-02-11T04:34:00+5:30
———————————————- वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी कळंब : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्ताने शहरातील डॉ. जयराम गुळभिले यांनी वाहन चालकांच्या ...

रिड टू मी स्टुडंट एडीशन ॲप वितरण
———————————————-
वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी
कळंब : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्ताने शहरातील डॉ. जयराम गुळभिले यांनी वाहन चालकांच्या डोळ्यांची मोफत तपासणी करून त्यांना डोळ्यांविषयी घ्यावयाची काळजी याबद्दल विशेष मार्गदर्शन केले. यावेळी काहींच्या कलर व्हिजन टेस्टही करण्यात आल्या. यावेळी मोटार वाहन निरीक्षक अतुल चव्हाण, सहमोटार निरीक्षक कुलदीप पवार, नगरसेवक सतीश टोणगे, मंगेश यादव, बालाजी सुरवसे, ओंकार कुलकर्णी, तसेच जय संघर्ष वाहन चालक मालक संघटनेचे अध्यक्ष शफीक मोमीन, उपाध्यक्ष अजय सोनवणे, राजेंद्र त्रिवेदी, नाना हंडीबाग, रमेश इखे, बापू जोगदंड, बालू राऊत, आप्पा तोडकर आदी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १४ फेब्रुवारीपर्यंत मोफत डोळे तपासणी करण्यात येणार असल्याचे डॉ. जयराम गुळभिले यांनी यावेळी सांगितले.
———————————————-
प्रवासी निवारा उभारण्याची मागणी
उमरगा : तालुक्यातील गुंजोटी येथील बाहेर पेठ भागात एस. टी. बस थांबा येथे आमदार निधीतून प्रवासी निवारा करण्याची मागणी पंचायत समिती सदस्य क्रांतीताई व्हटकर यांनी आ. चौगुले यांच्याकडे केली आहे. तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे व मोठी बाजारपेठ असलेल्या गुंजोटी येथील बाहेर पेठ भागात एस. टी. बस थांबा असलेल्या ठिकाणी प्रवासी निवारा नसल्यामुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना उन्हात व पावसातच वाहनांची वाट पाहात तासनतास ताटकळत उभे राहावे लागत असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
———————————————-
राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत सोनालीला रौप्य पदक
सिंगल फोटो (९-२) प्रवीण गडदे
उस्मानाबाद : भारतीय ॲथलेटिक्स महासंघ आणि आसाम ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने गुवाहाटी येथे चालू असलेल्या जुनिअर गटातील ३६व्या राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत उस्मानाबादच्या सोनाली पवारने भालाफेक प्रकारात रौप्य पदक पटकावले. राज्य ॲथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष संजय बदोले, जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष भरत जगताप व सहसचिव तथा प्रशिक्षक योगेश थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाली पवार प्रशिक्षण घेत आहे. भोसरी, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत सोनालीने सुवर्ण पदक पटकाविले होते.
———————————————-
शिंदे यांचा सत्कार
फोटो (९-२) बालाजी आडसूळ
कळंब : येथे तहसीलदार म्हणून रोहन शिंदे यांनी पदभार स्वीकारला आहे. याबद्दल युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख सागर बाराते, राष्ट्रवादी वक्ता सेलचे प्रा. तुषार वाघमारे, राष्ट्रवादी युवकचे कार्याध्यक्ष समाधान बाराते यांनी शिंदे यांचा सत्कार केला.
———————————————-
मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करा
उस्मानाबाद : प्रत्येक राज्यातील मंत्रालय, राज्य सभा व देशातील केंद्रीय सचिवालय, दिल्ली येथे ‘अन्यायाविरोधची आरोळी’ नावाने व्यासपीठ उपलब्ध करून भारतीय, अभारतीय नागरिकांना मत मांडण्याचा अधिकार द्यावा. तसेच त्याद्वारे व्यक्त होणाऱ्या मतांची नोंद व रेकाॅर्डिंग जमा करून त्यावर राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री इतरांनी विचारमंथन करावे, अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांनी केली आहे. याबाबत त्यानी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधितांना निवेदन पाठविले.
———————————————-
राजाराम भिसे यांची नियुक्ती
कळंब : उस्मानाबाद येथे झालेल्या बैठकीमध्ये तालुक्यातील एकुरगा येथील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ कार्यकर्ते राजाराम भिसे यांची उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा सचिवपदी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली. यावेळी परिवहन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष जीवनरावजी गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तालुकाध्यक्ष श्रीधर भवर, ॲड. प्रवीण यादव, पंचायत समिती उपसभापती गुणवंत पवार, कार्याध्यक्ष शिवाजी लकडे, दिलीप घोलप, हनुमंत पाटोळे, सुरेश टेकाळे, आयाज शेख, मृत्युंजय बनसोडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष भीमा हगारे आदी उपस्थित होते.
———————————————-
स्वामी, मगर यांची निवड
(दोन सिंगल फोटो : अजीत चंदनशिवे १०)
तुळजापूर : उस्मानाबाद जिल्हा विज्ञान अध्यापक महामंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. यात जिल्हाध्यक्षपदी रवींद्र स्वामी, तर जिल्हा संघटकपदी प्रकाश मगर यांची निवड झाली. कार्यकारिणीत कार्यकारी अध्यक्ष किशोर पवार, जिल्हा उपाध्यक्ष रामकिशन गायकवाड, सचिव बाळासाहेब चंदनशिवे, सहसचिव रमेश चेंडकाळे, कोषाध्यक्ष अजित साळुंके, प्रसिद्धीप्रमुख सरिता हिरासकर, सदस्य विशाल पवार, तुकाराम गरुडे, दिलीप माने, डॉ. संदीप मोहोळकर, गोरोबा सातपुते यांचा समावेश आहे.
——————————————-
पशु वंध्यत्व निवारण शिबिर
उस्मानाबाद : मराठवाडा व विदर्भ दुग्ध प्रकल्प ‘महादूध’ व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील उपळे (मा) येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत येणाऱ्या जहागीरदारवाडी येथे पशुंसाठी गोचीड, गोमशा निर्मूलन व वंध्यत्व निवारण शिबिर घेण्यात आले. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्नील जिंतपुरे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरासाठी गावातील अर्जुन रणखांब, विलास सुरवसे, दादा मिसाळ, गणपत मिसाळ, विकास सुरवसे, शेकबा सुरवसे, नाना कांबळे, ग्रामसेवक जमाले, अमोल रणखांब, महादेव घोगरे, काका पवार, जयराम देशमुख यांनी सहकार्य केले.
——————————————-
(फक्त फोटो : बालाजी बिराजदार ०९)
तुळजापुर तालुक्यातील अणदूर ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच रामचंद्र आलुरे यांचा सत्कार करण्यात आा. यावेळी लोहारा शहरातील विठ्ठल वचने पाटील, बाळासाहेब पाटील, के. डी. पाटील, हरी लोखंडे, विजयकुमार ढगे, आरीफ खानापुरे, दीपक मुळे आदी उपस्थित होते.
———————————————-