रमेश जाधव विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:32 IST2021-01-20T04:32:32+5:302021-01-20T04:32:32+5:30
मुरुम : नाईकनगर ग्रामपंचायतीच्या सातपैकी सहा जागा बिनविरोध निघाल्याने एका जागेची निवडणूक झाली. यात काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे रमेश जाधव ...

रमेश जाधव विजयी
मुरुम : नाईकनगर ग्रामपंचायतीच्या सातपैकी सहा जागा बिनविरोध निघाल्याने एका जागेची निवडणूक झाली. यात काँग्रेस पुरस्कृत पॅनलचे रमेश जाधव विजयी झाले. जाधव यांचा युवक काँग्रेसचे जिल्हा सचिव योगेश राठोड यांच्यासह कार्यकत्यांनी सत्कार करुन जल्लोष केला.
रस्त्याची दुरवस्था
उस्मानाबाद : शहरातील शांतीनिकेतन भागातील अंतर्गत रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. यामुळे या भागातील रहिवासी त्रस्त असून, पालिका प्रशासनाने रस्त्याच्या दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
वाहतूक कोंडी
तुळजापूर : शहरात मोकाट जनावरांचा वावर वाढला असून, रहदारीच्या मार्गावर ही जनावरे थांबत असल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. शिवाय, वाहतूक कोंडीही होत असून, या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
प्रशिक्षण सुरू
परंडा : शेळगाव येथे उमेद समुहातील महिलांना दहा दिवसीय कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षणाचा शुभारंभ पंचायत समिती सभापती अनुजा जौन यांच्या हस्ते झाला. यावेळी कलीम शेख, विकास गोफणे, माणिकराव सोनटक्के उपस्थित होते.
अवैध धंदे वाढले
उमरगा : तालुक्यात मटका, जुगार, बेकायदा दारू विक्री यासारखे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. शिवाय महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची देखील खुलेआम विक्री सुरू असून, यावर कारवाईची मागणी केली जात आहे.