नागूर येथे रामदिंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:29 IST2021-01-21T04:29:51+5:302021-01-21T04:29:51+5:30

बालाजी बिराजदार २०) लोहारा : तालुक्यातील नागूर येथे श्रीराम मंदिर निर्माण व जनजागरण अभियानानिमित्त रामदिंडी काढण्यात आली. नागूर येथील ...

Ramdindi at Nagur | नागूर येथे रामदिंडी

नागूर येथे रामदिंडी

बालाजी बिराजदार २०)

लोहारा : तालुक्यातील नागूर येथे श्रीराम मंदिर निर्माण व जनजागरण अभियानानिमित्त रामदिंडी काढण्यात आली.

नागूर येथील नागोबा मंदिर येथून बैलगाडी सजवून त्यामध्ये श्रीराम मूर्ती ठेवून गावातून दिंडी काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी या दिंडीचे पूजन व सहभागी कारसेवकांची आरती करून त्यांच्यावर फुले उधळली. यानंतर हनुमान मंदिराजवळ सियावर रामचंद्र की जय अशा घोषणा देण्यात आल्या. या अभियानाचे प्रास्ताविक लोहारा तालुका निधी तथा हिशोब प्रमुख शहाजी जाधव यांनी केले. यावेळी तालुका पालक दत्तात्रय दंडगुले, अभियानप्रमुख मुरलीधर होनाळकर, सहप्रमुख किशोर होनाजे, प्रा.यशवंत चंदनशिवे, मनोज तिगडे, व्यंकटेश पोतदार, शिवाजी पवार, सरपंच गजेंद्र जावळे, कारसेवक दत्ता सलगरे, प्रकाश चंदनशिवे,वामन लोहटकर, बबन जावळे,अंगद पाटील, रणजित पवार, मारुती मोरे, नागनाथ भजनी मंडळ, तरुण, महिला वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Ramdindi at Nagur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.