पारगावात राकाँचे वर्चस्व कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:34 IST2021-01-19T04:34:12+5:302021-01-19T04:34:12+5:30

येथील ग्रामपंचायत १३ सदस्यांची असून, निवडणुकीत ५२ उमेदवार रिंगणात होते. येथे भाजपचे महादेव आखाडे यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली होती. ...

Rakas continue to dominate in Pargaon | पारगावात राकाँचे वर्चस्व कायम

पारगावात राकाँचे वर्चस्व कायम

येथील ग्रामपंचायत १३ सदस्यांची असून, निवडणुकीत ५२ उमेदवार रिंगणात होते. येथे भाजपचे महादेव आखाडे यांनीही प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पॅनलमधील सात उमेदवारांनी विजय मिळविला असून, शिवसेना पक्षात समन्वयाअभावी झालेल्या बंडखोरीमुळे त्यांना दोनच जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत कॉ. पंकज पंजाब चव्हाण, अंजली समाधान मोटे, राजाभाऊ अर्जुन कोळी व सुशांत कोकणे या चार अपक्षांसह राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे सोनाली श्रीमंत निगुळे, धनंजय भागवत मोटे, आशाबाई रतन औताने, महेश संदीपान कोळी, नवनाथ रामभाऊ आखाडे, वत्सलाबाई बब्रुवान बाराते, अश्विनी गावडे तर शिवजल आघाडीच्या उषा सहदेव तातुडे व प्रतीक्षा निलेश पाटील हे उमेदवार विजयी झाले.

Web Title: Rakas continue to dominate in Pargaon