येळीत दारू अड्ड्यावर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:34 IST2021-01-19T04:34:47+5:302021-01-19T04:34:47+5:30
रस्त्यात रिक्षा केला उभा चालकावर गुन्हा उस्मानाबाद : वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस पथकाच्या वतीने कारवाया केल्या जात ...

येळीत दारू अड्ड्यावर धाड
रस्त्यात रिक्षा केला उभा चालकावर गुन्हा
उस्मानाबाद : वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनचालकांवर पोलीस पथकाच्या वतीने कारवाया केल्या जात आहेत. १७ जानेवारी रोजी वाशी तालुक्यातील सरमकुंडी येथील दत्तात्रय लाेखंडे याने वाशी शहरातील रस्त्यावर रिक्षा उभा केल्याचे वाशी पोलिसांस आढळून आला. यावरून संबंधिताविरुद्ध वाशी ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
मतिमंद बालिकेवर अत्याचार दोघांविरुद्ध गुन्हा
उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका १५ वर्षीय मतिमंद बालिकेवर गल्लीतीलच दोन युवकांनी लैंगिक अत्याचार केला. ही घटना १६ व १७ जानेवारी रोजी घडली. या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.
एक १५ वर्षीय मतिमंद बालिकेस गल्लीतीलच दोन युवकांनी १६ व १७ जानेवारी रोजी गल्लीतीलच एका पत्रा शेडमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला, अशी फिर्याद पीडित बालिकेच्या पित्याने पोलिसांत दिली. यावरून संबंधित दोन तरुणाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.
भूखंडाच्या कारणावरून माय-लेकीस मारहाण
उस्मानाबाद : भूखंडाच्या कारणावरून मायलेकीस ७ जणांनी बेदम मारहाण केली. ही घटना उस्मानाबाद शहरात १७ जानेवारी रोजी घडली.
उस्मानाबाद येथील प्रतिमा शिनगारे या त्याच्या आईसह आपल्या घरी होत्या. यावेळी रमेश यादव, कल्पना यादव, बापू भडंगे, सखुबाई भडंगे, कल्पना भडंगे, लोंढे बाई, बबड्या लोंढे यांनी तेथे येऊन भूखंडाच्या वादावरुन प्रतिमा शिनगारे यांसह त्यांच्या आईस शिवीगाळ करून दगड, काठीने मारहाण करून जखमी केले, अशी फिर्याद शिनगारे यांनी दिली. यावरून संबंधिताविरुद्ध उस्मानाबाद शहर पोलीस ठाण्यात दिली.