रुग्णालयातील निवाऱ्याचा प्रश्न लागला मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:36 IST2021-05-25T04:36:26+5:302021-05-25T04:36:26+5:30
रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, येथे निवारा उपलब्ध नसल्याने हे नागरिक उन्हात थांबत आहेत. शिवाय, येथे बसण्याचीही ...

रुग्णालयातील निवाऱ्याचा प्रश्न लागला मार्गी
रुग्णालयात लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, येथे निवारा उपलब्ध नसल्याने हे नागरिक उन्हात थांबत आहेत. शिवाय, येथे बसण्याचीही व्यवस्था नाही. त्यामुळे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे आणि डॉ. विक्रम आळंगेकर यांच्या विनंतीवरून प्रतिष्ठानच्या वतीने ४० बाय ५० आणि १० बाय ५० असे दोन ग्रीन शेड उभा करण्यात आले. यासोबतच ६० खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी माऊली प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष उमाकांत माने, डॉ. विक्रम आळंगेकर, डॉ. प्रवीण जगताप, डॉ. संदीप पोफळे, डॉ. सोमनाथ कवठे, डॉ. पद्माकर घोगे, सिद्धेश्वर माने, अमोल पवार, संतोष कांबळे, संदीप वाघमारे, शोभा तुरोरे, अफसर तांबोळी, मंगल भालेराव, सुभद्रा गाढवे, आकाश चव्हाण, राहूल सुरवसे, भानुदास बोरूले, शैलेश नागणे, सिद्धू दुधभाते, सुमित घोटाळे आदीसह स्वयंसेवक आणि कर्मचारी उपस्थित होते.