नियम माेडणार्या १६५ जणांविरूद्ध दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:32 IST2021-05-16T04:32:06+5:302021-05-16T04:32:06+5:30
मुरुम -शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून नियम माेडणार्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार शहरात विनामास्क ...

नियम माेडणार्या १६५ जणांविरूद्ध दंडात्मक कारवाई
मुरुम -शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून नियम माेडणार्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार शहरात विनामास्क फिरणार्या १४८ जणांकडून २६ हजार ६०० तर नियमांचे उल्लंघन करणार्या १७ दुकानदारांकडून ९ हजार ५०० रूपयांच दंड वसूल करण्यात आला. तसे आठ दुकाने सील करण्यात आली आहेत.
शहरात कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत असल्याने प्रशासनाकडून कडक निर्बंधांची अमंलबजावणी केली जात आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरात आतापर्यंत २०४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १४९ जणांनी कोरोनावर मात केली असून सध्या ५५ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. तर या आजाराने शहरात आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला आहे. शहरात आठ प्रभाग असून प्रत्येक प्रभागात कोरोनाने शिरकाव केला आहे. शहरातील बाजारपेठेशी परिसरातील २५ ते ३० गावांचा व्यवहार निघडीत आहे.त्यामुळे शहराबाहेरील लोकांची खरेदीसाठी नेहमी वर्दळ होत असते. या शिवाय बँका, कृषी उत्पन्न बाजार समिती, दवाखाने असल्याने अत्यावश्यक कामासाठीही परिसरातील लोक शहरात येत असतात. त्यामुळे शहरात कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून लॉकडाऊनऊनचे नियम माेडणार्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, कार्यालयीन अधिकक्षक यु. जे. देशपांडे, सहायक नगर रचनाकार विक्रम देवकर, सपोनि यशवंत बारवकर, सपोनि रंगनाथ जगताप, फौजदार शिवदर्शन बिरादार यांच्यासह पालिका आणि पोलीस कर्मचारी नियम ताेडणार्यांवर कारवाईचा बडगा उगारत आहेत. शहरात विनामास्क फिरणार्या १४८ जणांवर कारवाई करीत त्यांच्याकडून २६ हजार ६०० रुपयांचा तर लॉकडाऊनऊनचे नियम तोडून दुकाने चालू ठेवणार्या १७ दुकानदारांकडून ९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच आठ दुकाने सील करण्यात आली आहेत.
चाैकट...
मुरूम शहरातील नागरीक व व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनऊनचे नियम पाळूनच दैनंदिन व्यवहार करावेत. मास्क, शारीरिक अंतर, सॅनिटायझरचा वापर नियमित करावा. कोरोनापासून स्वतःचे व कुटूंबासोबतच शहराचे ही संरक्षण करावे. नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी हेमंत किरुळकर, सपोनि यशवंत बारवकर यांनी केले आहे.