कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस उपलब्ध करून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST2021-05-11T04:34:51+5:302021-05-11T04:34:51+5:30

कळंब -कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस मिळत नसल्याने त्या नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. प्रशासनाने कोवॅक्सिनचा दुसरा डोस त्वरित ...

Provide a second dose of the covacin vaccine | कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस उपलब्ध करून द्या

कोवॅक्सिन लसीचा दुसरा डोस उपलब्ध करून द्या

कळंब -कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस मिळत नसल्याने त्या नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे. प्रशासनाने कोवॅक्सिनचा दुसरा डोस त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी कळंब तालुका भाजपने उपविभागीय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

लसीकरण सुरू झाल्यानंतर ४५ वयाच्या पुढील हजारो नागरिकांनी कोवॅक्सिनचे लसीकरण करून घेतले. त्यांचा पहिला डोसचा कार्यकाल संपून गेला आहे. त्यामुळे दुसरा डोसच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना काळजी वाटत आहे. यासाठी प्रशासनाने आठवड्यातील एक किंवा दोन दिवस फक्त ४५ वर्षांवरील नागरिक व दुसरा डोस घेणारे यांच्यासाठी लसीकरणाचे नियोजन करावे. संदर्भात संबंधितांना सूचना द्यावी, अशी मागणी भाजपने या निवेदनात केली आहे.

यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दिलीप पाटील, तालुका सरचिटणीस संजय जाधवर, अनुसुचित जाती विभागाचे माजी जिल्हाध्यक्ष सतपाल बनसोडे, राज्य परिषद सदस्य शिवाजी गिड्डे, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस परशुराम देशमाने, राजेंद्र टोपे आदी उपस्थित होते.

Web Title: Provide a second dose of the covacin vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.