निवेदन देऊन नोंदविला केंद्र सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:22 IST2021-06-28T04:22:30+5:302021-06-28T04:22:30+5:30
: केंद्र सरकारच्या निष्क्रियपणा व आरक्षण विरोधी मानसिकतेमुळे ओबीसी समाजाचे महाराष्ट्रातील राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप करीत काँग्रेस पक्षाच्या ...

निवेदन देऊन नोंदविला केंद्र सरकारचा निषेध
: केंद्र सरकारच्या निष्क्रियपणा व आरक्षण विरोधी मानसिकतेमुळे ओबीसी समाजाचे महाराष्ट्रातील राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप करीत काँग्रेस पक्षाच्या वतीने उमरगा येथे शनिवारी प्रशासनाला निवेदन देऊन केंद्र सरकारचा निषेध नोंदविण्यात आला.
तत्पूर्वी, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केंद्र सरकारच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यानंतर तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष प्रकाश आष्टे, उपाध्यक्ष दिलीप भालेराव, सभापती सचिन पाटील, जि. प. सदस्य धनराज हिरमुखे, युवक काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष विजय वाघमारे, अल्पसंख्याकचे अध्यक्ष याकुब लादाफ, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष चंद्रशेखर पवार, ॲड. दिलीप सगर, पप्पू सगर, नगरसेवक महेश मशाळकर, विक्रम मस्के, परमेश्वर टोपगे, डिंगबर औरादे, बाबा मस्के, सोहेल इनामदार, आयुब जमादार, जीवन सरपे, चंद्रकांत मजगे, खालिद शेख, आयुब जमादार, राम धोत्रे, सुभाष पतंगे, भारत हिरवे, सुभाष जाधव, बसवराज कलशेट्टी, महेश पाटील, गोविंद सूर्यवंशी आदी उपस्थित होते.