शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मागासवर्गीय वस्तीसाठीचा निधी खर्च न करणाऱ्या दोन ग्रामसेवकांसह सरंपचाविरूद्ध कारवाईचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 18:08 IST

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर केला. 

ठळक मुद्देनिधी खर्च करण्यात कसूर गटविकास अधिकाऱ्यांनी ठेवला ठपका

वाशी (उस्मानाबाद ) : चौदाव्या वित्त आयोगातून उपलब्ध झालेला निधी मागासवर्गीय समाजबांधवांच्या वस्तीमध्ये खर्च न करणे बावी ग्रामपंचायतीचे तत्कालीन ग्रामसेवक व सरंपचास चांगलेच महागात पडले आहे.

कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत गटविकास अधिकाऱ्यांनी कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर केला. वाशी तालुक्यातील बावी येथील सरपंच शितल सुनिल शिंंदे व ग्रामसेवक एस. डी. भातलंवडे व पी. एम. जाधव यांनी १४ व्या वित्त आयोगातील मागासवर्गीय वस्तीसाठी तरतूदीनुसार खर्च केला नाही. तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनुदानाचा दुबार प्रस्ताव दिल्याची तक्रार दत्तात्रय शिंदे यांनी केली होती.

या सर्व बाबींच्या अनुषंगाने गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, सरपंच व ग्रामसेवक यांनी सन २०१७-१८ मध्ये मागासवर्गीय वस्तीमध्ये ‘एलईडी’ पथदिवे बसविल्याचे दिसून आले. परंतु, सन २०१५-१६, २०१६-१७ व २०१८-१९ या कालावधीत मागासवर्गीय वस्त्यांमध्ये कामे दर्शविलेली नाहीत. मागासवर्गीय वस्तीमध्ये तरतुदीनुसार विकास कामांवर खर्च करण्यास कार्यतत्परता दाखवली नाही,  असे नमूद करीत सरपंच शितल शिंंदे यांच्याविरूद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ (१) अन्वये कारवाई प्रस्तावित करण्यात यावी, असा प्रस्ताव सादर केला आहे.

तसेच ग्रामसेवक भातलवंडे व जाधव यांनी कर्तव्यात कसूर केली असून चौकशीसाठी अभिलेखेही उपलब्ध करून दिली नाहीत. त्यांच्यामुळे या दोघांवरही शिस्तभंगाची कारवाई करावी, असा प्रस्ताव वरिष्ठांना दिला आहे. त्यामुळे आता वरिष्ठांच्या भूमिकेडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :fundsनिधीgovernment schemeसरकारी योजनाblock development officerगटविकास अधिकारी