निधी संकलनासाठी ढोकी येथे शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:27 IST2021-01-17T04:27:45+5:302021-01-17T04:27:45+5:30
मंदिरासाठी देशभरात निधी संकलन महाअभियान सुरू झाले असून, या पार्श्वभूमीवर ढोकी गावातील प्रत्येक हिंदू कुटुंबापर्यंत हे अभियान पोहोचविण्याचा संकल्प ...

निधी संकलनासाठी ढोकी येथे शोभायात्रा
मंदिरासाठी देशभरात निधी संकलन महाअभियान सुरू झाले असून, या पार्श्वभूमीवर ढोकी गावातील प्रत्येक हिंदू कुटुंबापर्यंत हे अभियान पोहोचविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यानिमित्त ढोकी येथे ही निधी संकलन शोभायात्रा काढण्यात आली. हनुमान मंदिरापासून सुरू झालेली ही शोभायात्रा मुख्य मार्गावरून बसस्थानक, बालाजीनगर, दत्तनगर, राजेशनगर, समतानगर मार्गे मुख्य पेट्रोलपंप चौकातून टेकडीवर दत्त मंदिरात आली. या ठिकाणी महाप्रसाद वाटप करून सांगता झाली. यावेळी ‘जय श्रीराम’च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता.
या शोभायात्रेसाठी जिल्हा परिषद सदस्य तानाजी माळी, पंचायत समिती सदस्य संग्राम देशमुख, राष्ट्रीय स्वायसेवक संघाचे राजेश सन्यासी, कारसेवक विकास देशपांडे, पोलीसपाटील राहुल वाकुरे, संतोष तिवारी, बाबा अघोर, अमोल तिवारी, सचिन वाकुरे, संजय सुतार, दत्ता साळुंखे, संजय जाधव, संतोष कंदले, पावन कोळी, ओम देशमुख, धनंजय वाकुरे, योगेश देशमुख, गोपाळ तिवारी, मनोज साळुंखे, पंकज देशपांडे, महेश तिवारी, ओंकार धाकपाडे, नारायण शिंदे, भारत माळी, नाना देशपांडे, सुनील रोधवे, विष्णू गपाट, प्रसाद पाटील, अरुण देशमुख, अंकुश जाधव, बबन देशमुख, भाऊसाहेब गरड, प्रमोद जोशी, त्रिंबक भोळे, किशोर तिवारी, हणमंत साळुंखे, मुन्ना तिवारी, शैलेश धाकतोड, रामेश्वर पवार, गुणवंत सुतार, रणजित गुरव यांच्यासह हनुमान भजनी मंडळ, रामभक्तांनी पुढाकार घेतला.