तेर येथे जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:33 IST2021-04-02T04:33:53+5:302021-04-02T04:33:53+5:30
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे वानेवाडी रोडवरील एका हाॅटेलच्या बाजूस असलेल्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर ३१ मार्च ...

तेर येथे जुगार अड्ड्यावर छापा
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे वानेवाडी रोडवरील एका हाॅटेलच्या बाजूस असलेल्या शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर ३१ मार्च रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये ९ प्रतिष्ठीत व्यक्तींवर गुन्हा दाखल करून ७ दुचाकीसह सव्वा लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
तेर येथील वानेवाडी रोडवर जनता हाॅटेलजवळील माळी यांच्या शेतात तिर्रट नावाचा जुगार चालू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने ३१ मार्च रोजी या ठिकाणी पथकाने धाड टाकली. त्यामध्ये जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, गाद्या, पाण्याचे जार, ७ दुचाकी पथकाने जप्त केल्या. या प्रकरणी
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोकाॅ रविंद्र आरसेवाड यांच्या फिर्यादीवरून ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये
लक्ष्मण अंबादास राऊत (रा. तेर), आदेश भागवत मते, अमोल फुलचंद मगर (रा. वाघोली), भारत संभाजी उंबरे (रा. वाणेवाडी), शेरखान सजीर कोरबू (रा. तेर) यांच्यासह इतर अज्ञात चार जणांचा समावेश आहे. तसेच पथकाने छाप्यामध्ये जुगाराच्या साहित्यासह गाद्या, पाण्याचे जार, ७ दुचाकी हस्तगत केल्या. यामध्ये एमएच २५/ई/१८१४, एमएच २५/झेड/२१३५, एमएच २५/जी/७५१९, एमएच २५/एसी/१६९६, एमएच २५/एई/९७७५, एमएच २५/एक्यू/८३५९, एमएच २५/एस/८६४६ अशा १ लाख २५ हजार रूपयांच्या दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.