कर्तृत्ववान महिलांचा पिंपळगाव येथे गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:35 IST2021-03-09T04:35:16+5:302021-03-09T04:35:16+5:30
कळंब : तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील संतयोगी साधुबुवा महाराज मंदिर परिसरात प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त ...

कर्तृत्ववान महिलांचा पिंपळगाव येथे गौरव
कळंब : तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील संतयोगी साधुबुवा महाराज मंदिर परिसरात प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षस्थानी ॲड.शकुंतला फाटक-सावळे होत्या. यावेळी प्रा.मीनाक्षी शिंदे-भवर, प्राजक्ता पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ॲड.शकुंतला फाटक, प्रा.मीनाक्षी भवर, प्राजक्ता पाटील, महादेवी गोरे, रेखा कुलकर्णी, मुक्ताबाई सातपुते, नागर तांबारे, दुर्गा दशवंत, संगीता स्वामी, अर्चना टेकाळे, ज्योती दशवंत, दमयंती दशवंत, भारती गायकवाड, रंजना घोडके यांच्यासह गावातील ३० कर्तृत्ववान महिलांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सूत्रसंचालन अविनाश घोडके यांनी केले. कार्यक्रमासाठी भाई सुखदेव टेकाळे, हभप विष्णू पांचाळ, नारायण दशवंत, भाई मधुकर टेकाळे, बापू गुजर, तुकाराम धस, सरपंच संगीता स्वामी, मीरा स्वामी, सविता स्वामी, उषा स्वामी, त्रिशाला बारगुले, रूपाली घोडके, पल्लवी घोडके आदी हजर होते. कार्यक्रमासाठी राकेश घोडके, सागर घोडके, शुभम थोरात, साधू गुजर, सचिन टेकाळे, अशोक इंगोले, हनुमंत परदेशी आदींनी परिश्रम घेतले.