शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट कामाचा फटका! भूममध्ये पाझर तलाव फुटल्याने 150 एकर शेती उद्ध्वस्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 20:32 IST

स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण, प्रशासनाने तातडीने मदत जाहीर करावी, अशी मागणी

- संतोष वीर

भूम (धाराशिव): भूम शहरातील साबळेवाडी येथे 14 वर्षांपूर्वी बांधलेला एक पाझर तलाव आज दुपारी अचानक फुटला. या दुर्घटनेमुळे सुमारे 150 एकर शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. तलावाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहाचे योग्य नियोजन न झाल्याने ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी 3 वाजता हा पाझर तलाव अचानक फुटला. जोरदार पावसामुळे तलावात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते, मात्र योग्य सांडवा नसल्याने पाण्याचा दाब वाढला आणि तलावाचा बंधारा फुटला. यामुळे तलावातील दगड आणि गाळ मोठ्या वेगाने शेतात पसरला, ज्यामुळे उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.

नदीकाठी घबराट आणि प्रशासनाची धावपळ

​तलावाचे पाणी शहरातील लेंडी नदीपात्रात अचानक मोठ्या प्रवाहाने येऊ लागल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. नदीचा प्रवाह काही मिनिटांतच वाढल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना तलावापर्यंत पोहोचता आले नाही.

​सध्या नदीचा प्रवाह नियंत्रणात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तलाव फुटण्याची कारणे शोधण्यासाठी चौकशी सुरू असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

शेतकऱ्यांनी मदतीची मागणी केली

​या घटनेने बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी तातडीने मदतीची मागणी केली आहे. साबळेवाडी येथील शेतकरी रणजीत साबळे यांनी सांगितले की, "तलावाच्या निकृष्ट कामामुळे आज आमच्या 150 एकर जमिनीचे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करावी." या दुर्घटनेमुळे इतरही पाझर तलावांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :dharashivधाराशिवWaterपाणीRainपाऊसAgriculture Sectorशेती क्षेत्र