रस्त्याची दुरवस्था; वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:30 IST2021-03-08T04:30:25+5:302021-03-08T04:30:25+5:30
कलाम यांचे नाव देण्याची मागणी उमरगा : तालुक्यातील गुंजोटी येथील बाहेरपेठ भागात सार्वजनिक पाणीपुरवठा टाकीसमोरील अंजुमन ए-फला मशिदीकडे जाणाऱ्या ...

रस्त्याची दुरवस्था; वाहनधारक त्रस्त
कलाम यांचे नाव देण्याची मागणी
उमरगा : तालुक्यातील गुंजोटी येथील बाहेरपेठ भागात सार्वजनिक पाणीपुरवठा टाकीसमोरील अंजुमन ए-फला मशिदीकडे जाणाऱ्या मुख्य चौकाला दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे, अशी मागणी गुंजोटी येथील मुस्लिम बांधवांनी केली आहे. याबाबत शुक्रवारी ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले. यावर उस्मान सय्यद, परवेज काझी, हुसेन पिरजादे, मुनवर पठाण, मुसद्दीकीन शेख, झुबेर काझी, अनवर पठाण, शाबोद्दीन बिजापुरे, जुनेद उमापुरे, बशीर बिजापुरे, फय्याज कुरशी, अहेमद पटेल, मुद्दसर हत्ताळे, शब्बीर पटेल, इम्रान शेख, रफीक शेख, शफीक शेख, सलीम शेख, आयुब मोजनीदार आदींच्या सह्या आहेत.
साक्षी गल्डा हिची
चाचणीसाठी निवड
लोहारा : येथील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी दीपक गिल्डा हिची पनवेल येथे होणाऱ्या निवड चाचणीसाठी १९ वर्षीय वयोगटातील मुलींच्या संघात निवड झाली आहे. याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी बीडच्या बलभीम महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. संतोष उंदरे, प्रा. वीरभद्र स्वामी, प्रा. यशवंत चंदनशिवे, कबड्डी प्रशिक्षक विवेकानंद क्षीरसागर, ग्रा. शिवाजी जाधव, महादेव कदम आदी उपस्थित होते.
हरिनाम सप्ताहास सारोळा येथे प्रारंभ
उस्मानाबाद: तालुक्यातील सारोळा (बुद्रुक) येथे रविवारी अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ झाला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डिस्टन्स ठेवून हा सप्ताह होत आहे. यावेळी गावातील श्री विठ्ठल - रूक्मिणी मंदिरात मान्यवरांच्या हस्ते पूजन करून सप्ताहास सुरुवात करण्यात आली. यावेळी जीवन चंदणे, धैर्यशील पाटील, सुरेश देवगिरे, ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले, नितीन पाटील, बाळासाहेब देवगिरे, नामदेव खरे, संदीपान देवगिरे, पोलीसपाटील प्रीतम कुदळे, बीट अमलदार मन्मथ महाराज स्वामी, संतोष शिंदे, पंडित देवकर, ह. भ. प. बबन मिटकरी, अरूण मसे, सुभाष रणदिवे, पांडुरंग रणदिवे, सुरेश कोल्हे, कल्याण रणदिवे, अजय उकिरडे, मैनाबाई चंदणे, तारामतीताई माळी, इंदुबाई देवगिरे, वृंदावणी रणदिवे, वंदाना कुदळे आदी उपस्थित होते.
मार्गदर्शन हवे (कोरोना लस)
कसबे तडवळे : आता ज्येष्ठांनाही कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. मात्र, लसीकरणासाठी नोंदणी कुठे व कशी करायची, याबाबत ग्रामीण भागात अनेकांना माहिती नाही. त्यामुळे आरोग्य विभागाने जनजागृती करण्याची गरज व्यक्त होत आहे.
माठांना मागणी
(फोटो)
उस्मानाबाद : मागील काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. यामुळे नागरिकांनी घरातील कुलर, पंखे बाहेर काढले असून, अनेकांनी नवीन खरेदीसाठी दुकानात गर्दी केल्याचे दिसत आहे. शिवाय, गरिबांचा फ्रीज अशी ओळख असलेल्या माठांची मागणी वाढली आहे.
वर्दळ घटली
उस्मानाबाद : जिल्ह्यात दररोज वाढत चाललेल्या उन्हाच्या तीव्रतेने अंगाची काहिली होऊ लागली आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत उन्हाची तीव्रता जाणवत असल्यामुळे या काळात शहरातील रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली आहे.
ग्राहक त्रस्त
मुरूम : उमरगा तालुक्यातील मुरूम परिसरात बीएसएनएल मोबाईलची रेंज सातत्याने गायब होत आहे. यामुळे मोबाईलधारक त्रस्त असून, अनेक ग्राहक खासगी कंपन्यांकडे वळत आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्राहकांमधून होत आहे.
गुटखा विक्री सुरूच
येरमाळा : येरमाळासह परिसरातील गावात महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री सुरू आहे. विशेष म्हणजे, काही किराणा दुकानातून याची विक्री होत असून, कारवाईची मागणी करण्यात येत आहे.