पोलीस पथकाचे ठिकठिकाणी छापे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:20 IST2021-07-05T04:20:39+5:302021-07-05T04:20:39+5:30
तुळजापूर : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने २ जुलै रोजी मातंगनगर भागात छापा टाकला. यावेळी भाऊराव शंकर जाधव हे त्यांच्या ...

पोलीस पथकाचे ठिकठिकाणी छापे
तुळजापूर : येथील पोलीस ठाण्याच्या पथकाने २ जुलै रोजी मातंगनगर भागात छापा टाकला. यावेळी भाऊराव शंकर जाधव हे त्यांच्या घरासमोर गावठी दारूसह मिळून आले. पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करून तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
उमरग्यात छापा
उमरगा : येथील पोलिसांनी तुरोरी येथे २ जुलै रोजी छापा टाकला. यावेळी राजेंद्र जाधव हे गावातील हॉटेलसमोर जुगार साहित्य व रोख रकमेसह मिळून आले. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त करून, जाधव यांच्याविरुद्ध उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
एकास मारहाण
परंडा : भोत्रा येथील बाबुराव गोफने हे १ जुलै रोजी त्यांच्या शेताजवळील रस्त्यावर होते. यावेळी अजित व किशोर पवार यांनी बाबुराव यांना शिवीगाळ करीत लाथाबुक्क्याने मारहाण केली, तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी परंडा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.