दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:26 IST2020-12-25T04:26:29+5:302020-12-25T04:26:29+5:30

महिलेवर कारवाई ढोकी : येथील पोलिस ठाण्याच्या पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन २३ डिसेंबर रोजी काजळा पाटी येथे छापा ...

Police raids on liquor dens | दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

दारू अड्ड्यांवर पोलिसांचे छापे

महिलेवर कारवाई

ढोकी : येथील पोलिस ठाण्याच्या पथकाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरुन २३ डिसेंबर रोजी काजळा पाटी येथे छापा टाकला. यावेळी अनुसया पवार यांनी राहत्या घरासमोर एका कॅनमध्ये १५ लिटर गावठी दारू बाळगल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करुन ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांची धाड

नळदुर्ग : येथील पोलिस ठाण्याच्या पथकाने शहरात चालणाऱ्या एका जुगार अड्ड्यावर धाड टाकून एकावर कारवाई केली. २३ डिसेंबर रोजी येथील बससञथानकाजवळ चालणाऱ्या कल्याण मटका जुगाराच्या अड्ड्यावर हा छापा टाकण्यात आला. येथे महंमद याकूब शेख (रा. नळदुर्ग) हा जुगाराचे साहित्य व रोख ५५० रुपयांसह पथकास मिळून आला. त्याच्याकडून हा मुद्देमाल जप्त करून नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Police raids on liquor dens