जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:29 IST2021-04-26T04:29:32+5:302021-04-26T04:29:32+5:30
विद्युत खांबावरील साहित्याची चोरी उस्मानाबाद : तालुक्यातील गावसूद शिवाराती विद्युत खांबावरील साहित्याची चोरी झालञयाची घटना १३ व १४ एप्रिल ...

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
विद्युत खांबावरील साहित्याची चोरी
उस्मानाबाद : तालुक्यातील गावसूद शिवाराती विद्युत खांबावरील साहित्याची चोरी झालञयाची घटना १३ व १४ एप्रिल दरम्यान घडली. याबाबत अक्षय अनिल मुळे (रा. उक्कडगाव, ता. बार्शी) यांनी दिलेल्या फिर्यादीत सदर खांबावरील ॲल्युमिनियम वायरसह सस्पेन्शन हार्डवेअर, केव्ही पीन इन्सुलेटर, केव्ही डिक्स इन्सुलेटर असा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे म्हटले आहे. यावरून येथील ग्रामीण पोलिस ठाण्यात २३ एप्रिल रोजी अज्ञात चोरट्याविरुध्द भादंसं कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
मारहाण प्रकरणात परस्पर विरोधी गुन्हे
कळंब : तालुक्यातील हावरगाव येथे दोन कुटुंबीयात झालेल्या मारहाण प्रकरणात परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २३ मार्च रोजी हावरगाव येथील सुधाकर उत्तम कोल्हे व अन्य तिघे आणि अतूल आबासाहेब कोल्हे व अन्य पाचजण या दोन कुटुंबात हावरगाव शिवारातील शेतात वाद झाला. यात दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना शिवीगाळ करीत मारहाण केले. याप्रकरणी सुधाकर कोल्हे व अतुल कोल्हे यांनी परस्पर विरोधी दिलेल्या फिर्यादीवरून कळंब पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जुन्या वादातून दोन गटात झाली मारहाण
उमरगा : तालुक्यातील पळसगाव तांडा येथील लखन धनू चव्हाण यांच्यासह आठजण व रमेश सुभाष राठोड यांच्यासह आठजण या दोन कुटुंबियांत २३ मार्च रोजी राहत्या तांड्यावर वाद झाला. यात दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी परस्पर विरोधी कुटुंबियास शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने, लोखंडी पाईप, दगड व काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी लखन चव्हाण व रमेश राठोड यांनी परस्पर विरोधी दिलेल्या २ तक्रारींवरून उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.
जुन्या भांडणातून एकास जबर मारहाण
उस्मानाबाद : जुन्या भांडणातून एकास मारहाण झाल्याची घटना २३ एप्रिल रोजी शिंगोली शिवारातील रायगड ढाब्यासमोर घडली. उपळे (मा) येथील उमाकांत जगन्नाथ घोगरे यांना अक्षय जाधव, साई पवार, राहूल सूर्यवंशी (तिघे रा. उस्मानाबाद) यांनी लाथाबुक्क्याने, लोखंडी गज, दगडाने मारहाण करून जखमी केले, असा जबाब उमाकांत घोगरे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिला. यावरून वरील लोकांविरुध्द येथील आनंद नगर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.