लोहारा पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:32 IST2021-01-03T04:32:29+5:302021-01-03T04:32:29+5:30

लोहारा : कोरोना महामारीच्या काळात तालुक्यातील पोलीस पाटलांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पोलीस विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या ...

Police patrol at Lohara police station | लोहारा पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांचा गौरव

लोहारा पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांचा गौरव

लोहारा : कोरोना महामारीच्या काळात तालुक्यातील पोलीस पाटलांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल पोलीस विभागाच्या वतीने पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या हस्ते पोलीस पाटील यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

शुक्रवारी ग्रामपंचायत निवडणुकांसंदर्भात लोहारा पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील पोलीस पाटलांना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धरमसिंग चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या जिल्हा उपाध्यक्षा मनीषा जगताप यांच्यासह तालुका सचिव संजय नरगाळे, भाऊसाहेब पाटील, मारुती लोहार, प्रदीप पाटील, राजेंद्र भोजने, तानाजी माटे, निळकंठ कोठावळे, धनराज हावळे, दीपक जाधव, सुखराज पाटील, बिरुदेव सूर्यवंशी, दादासाहेब मुर्टे, ईश्वर सुरवसे, मनीषा चाकुरे, बालाजी कदम, बालाजी मातोळे, अमोल गव्हाळे तसेच पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Police patrol at Lohara police station