दर गडगडल्याने कोबीवर नांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:30 IST2021-03-25T04:30:28+5:302021-03-25T04:30:28+5:30
किरकोळ विक्रेत्यांकडे कोणताही भाजीपाला १० रुपयांत किलो मिळत असला तरी शेतकऱ्यांना ठोक बाजारात मात्र अगदी २ ते ३ रुपये ...

दर गडगडल्याने कोबीवर नांगर
किरकोळ विक्रेत्यांकडे कोणताही भाजीपाला १० रुपयांत किलो मिळत असला तरी शेतकऱ्यांना ठोक बाजारात मात्र अगदी २ ते ३ रुपये दराने भाजीपाला सोडावा लागत आहे. या भाजीची विक्री झाल्यानंतर हातावर पडणारी पट्टी ही वाहतुकीचा खर्चही भरुन काढणारी ठरत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. परिणामी, भाजीपालाच मोडून टाकण्याचे पाऊल उचलले जात आहे. याचा प्रत्यय बुधवारी काजळा येथील तरुण शेतकरी धनाजी अंबादास लोमअे यांनी आणून दिला. त्यांनी २० गुंठ्यात पत्ता व फूलकोबीची लागवड केली होती. रोपांसाठी ४ हजार खर्च केले. तर खत, औषध व लागवड खर्च सुमारे ८ हजार ५०० रुपये केला. पीक चांगले तरारुन आले होते. जेव्हा काढणीची वेळ आली, तेव्हा बाजारपेठेत दर कोसळला. त्यांनी नुकताच एक मालवाहू करून हा भाजीपाला मार्केटमध्ये नेला होता. तेथे २ रुपये किलो दराने खरेदी झाली व हातावर २ हजार रुपयेही पडले नाहीत. काढणी तसेच वाहतूक खर्च यातून भागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर व्यथित होऊन लोमटे यांनी कोबीवर ट्रॅक्टर फिरवून तो माेडित काढला.
240321\24osm_2_24032021_41.jpg
बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर कोसळल्यामुळे वाहतूक खर्चही निघत नसल्याचे सांगत काजळा येथील एका तरुण शेतकर्याने कोबीवर नांगर फिरविला.