राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेत खेळाडू चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:43 IST2021-02-27T04:43:35+5:302021-02-27T04:43:35+5:30

तुळजापूर : जळगाव येथे झालेल्या ७ व्या राज्यस्तरीय ज्युनियर सॉफ्ट टेनिस आणि ८ व्या सिनियर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत उस्मानाबाद ...

Players shine in state level tennis tournament | राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेत खेळाडू चमकले

राज्यस्तरीय टेनिस स्पर्धेत खेळाडू चमकले

तुळजापूर : जळगाव येथे झालेल्या ७ व्या राज्यस्तरीय ज्युनियर सॉफ्ट टेनिस आणि ८ व्या सिनियर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हा सब ज्युनियर संघाने द्वितीय क्रमांक पटकावून रजत पदक प्राप्त केले. या संघामध्ये यशराज हुंडेकरी, उमेश माळी, ऋषिकेश दुनाखे, स्वराज भिसे, कृष्णा थिटे, प्रथमेश वाघ यांचा समावेश होता.

जळगाव येथे झालेल्या स्पर्धेत सिनियर संघानेही चमकदार कामगिरी केली. तृतीय क्रमांक पटकावत कांस्य पदक मिळविले. या संघामध्ये करण खंडागळे, प्रज्वल ढवळे, किशोर हंगे, आदित्य सापते, दीपक फड, संजय नागरे, शुभम जकाते, सुरेश मुंडे, दशरथ घुले यांचा समावेश होता. सब ज्युनियर मुली सिंगल इव्हेंट प्रकारामध्ये प्रियंका किरण हंगरगेकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या यशामुळे प्रियंका हंगरगेकर हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अंडर १७ राष्ट्रीय स्पर्धेसाठी यशराज हुंडेकरी, स्वराज भिसे, कृष्णा थिटे यांची निवड झाली. शिवाय सिनियर संघातून संजय नागरे, करण खंडागळे हे पात्र ठरले. तसेच मुलींमध्ये प्रेरणा देशमुख हिची निवड झाली.

Web Title: Players shine in state level tennis tournament