शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडू चमकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 4:45 AM

तुळजापूर : जळगाव येथे झालेल्या ७ व्या राज्यस्तरीय ज्युनियर सॉफ्ट टेनिस आणि ८ व्या सिनियर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत उस्मानाबाद ...

तुळजापूर : जळगाव येथे झालेल्या ७ व्या राज्यस्तरीय ज्युनियर सॉफ्ट टेनिस आणि ८ व्या सिनियर सॉफ्ट टेनिस स्पर्धेत उस्मानाबाद जिल्हा सब ज्युनियर संघाने द्वितीय क्रमांक पटकावून रजत पदक प्राप्त केले. या संघामध्ये यशराज हुंडेकरी, उमेश माळी, ऋषिकेश दुनाखे, स्वराज भिसे, कृष्णा थिटे, प्रथमेश वाघ यांचा समावेश होता. तसेच सिनियर संघाने तृतीय क्रमांक पटकावत कांस्य पदक मिळविले. या संघामध्ये करण खंडागळे, प्रज्वल ढवळे, किशोर हंगे, आदित्य सापते, दीपक फड, संजय नागरे, शुभम जकाते, सुरेश मुंडे, दशरथ घुले यांचा समावेश होता. सब ज्युनियर मुली सिंगल इव्हेंट प्रकारामध्ये प्रियंका किरण हंगरगेकर हिने प्रथम क्रमांक प्राप्त करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. या यशामुळे प्रियंका हंगरगेकर हिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अंडर १७ राष्ट्रीय स्पर्धेसाठी यशराज हुंडेकरी, स्वराज भिसे, कृष्णा थिटे यांची निवड झाली. शिवाय सिनियर संघातून संजय नागरे, करण खंडागळे हे पात्र ठरले. तसेच मुलींमध्ये प्रेरणा देशमुख हिची निवड झाली.