उमरग्याच्या पोलीस वसाहतीत वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:22 IST2021-06-10T04:22:35+5:302021-06-10T04:22:35+5:30

उमरगा : शहरातील पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी पोलीस वसाहतीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, माजी ...

Plantation in Umarga police colony | उमरग्याच्या पोलीस वसाहतीत वृक्षारोपण

उमरग्याच्या पोलीस वसाहतीत वृक्षारोपण

उमरगा : शहरातील पोलीस ठाण्याच्या वतीने बुधवारी पोलीस वसाहतीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, माजी पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव, शांतिदूत परिवाराच्या अध्यक्ष विद्याताई जाधव, सपोनि सिद्धेश्वर गोरे, शांतिदूत परिवारचे प्रदेश सरचिटणीस प्रा. युसूफ मुल्ला, मराठवाडा अध्यक्ष प्रा. जीवन जाधव आदी उपस्थित होते. यावेळी राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, शांतिदूत परिवाराच्या राष्ट्रीय अध्यक्ष विद्याताई जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अनुराधा उदमले, पोलीस निरीक्षक मुकुंद अघाव यांच्याहस्ते पोलीस नाईक

नागेश गरुड, शीतल गरुड, सोमनाथ ढोले, माऊली डिगुळे, हभप बाळू मोरे, तसेच गरुडझेप फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश गरूड, रफिक शेख, लक्ष्मण मिसाळ यांना महाराष्ट्र शांतिदूत सेवारत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

Web Title: Plantation in Umarga police colony