ऑक्सिजन उपलब्धतेसाठी वृक्षलागवड करा : देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:22 IST2021-06-19T04:22:27+5:302021-06-19T04:22:27+5:30

देशमुख यांनी गुरुवारी तालुक्यातील विविध गावांत भेटी देऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तालुक्यातील कोरोना संसर्गाची स्थिती, पक्षाच्या ...

Plant trees for oxygen availability: Deshmukh | ऑक्सिजन उपलब्धतेसाठी वृक्षलागवड करा : देशमुख

ऑक्सिजन उपलब्धतेसाठी वृक्षलागवड करा : देशमुख

देशमुख यांनी गुरुवारी तालुक्यातील विविध गावांत भेटी देऊन पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तालुक्यातील कोरोना संसर्गाची स्थिती, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीचा आणि कामाचा आढावा घेतला. तालुक्यात कोरोना संसर्ग कमी होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यापुढील काळात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करावे. स्वच्छता मोहीम राबवावी. ठिकठिकाणच्या प्लास्टिकची होळी करून आपला गाव, परिसर अधिकाधिक स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा. पक्षाच्या ध्येय धोरणानुसार कार्यक्रम घ्यावेत, असे आवाहन केले.

यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक पांडुरंग पवार, तालुकाध्यक्ष महादेव वडेकर, पं. स. सदस्य सीताराम वनवे, माजी सदस्य मधुकर अर्जुन, तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर, भाऊसाहेब कुठे, बालाजी बांगर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष मेहबूब शेख, सचिन बारगजे, हेमंत देशमुख, शंकर खामकर, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण भोरे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Plant trees for oxygen availability: Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.