नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:59 IST2021-02-06T04:59:52+5:302021-02-06T04:59:52+5:30
फोटो (५-२) संतोष मगर तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील अत्याचारप्रकरणी अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संभाजी ...

नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी
फोटो (५-२) संतोष मगर
तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील अत्याचारप्रकरणी अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी संभाजी ब्रिगेड व शिवरत्न प्रतिष्ठान यांच्या वतीने तामलवाडी पोलीस ठाणे येथे दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथे एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर दोन नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, एक नराधम फरार झाला आहे. या फरार झालेल्या नराधमाला तात्काळ अटक करून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेड व शिवरत्न प्रतिष्ठान तामलवाडी यांच्या वतीने तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन पंडित व उपनिरीक्षक रमेश घुले यांच्याकडे केली. निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष सर्जेराव गायकवाड, शिवरत्नचे सचिव दत्तात्रय गवळी, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, तुकाराम सुरवसे, लक्ष्मण गायकवाड, नागनाथ मसुते, अमोल गायकवाड, नागेश शिंदे, एकनाथ गायकवाड यांनी स्वाक्षरी केली आहे.