वाहनचालकास दंडाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:30 IST2021-03-24T04:30:39+5:302021-03-24T04:30:39+5:30

एकावर कारवाई उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील आनाळा येथील चंद्रहार ईटकर यांनी आनाळा चौकात रहदारीच्या ठिकाणी मानवी जीवितास धोका होईल ...

Penalty for driving | वाहनचालकास दंडाची शिक्षा

वाहनचालकास दंडाची शिक्षा

एकावर कारवाई

उस्मानाबाद : परंडा तालुक्यातील आनाळा येथील चंद्रहार ईटकर यांनी आनाळा चौकात रहदारीच्या ठिकाणी मानवी जीवितास धोका होईल अशा रीतीने ऑटोरिक्षा उभी केल्याचे पोलिसांच्या पथकास आढळले. यावरून गुन्हा नोंद करण्यात आला.

नागरिक बिनधास्त

उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन्स राखण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन केले जात आहे. परंतु, नागरिक मात्र याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

वाहतूककोंडी

उस्मानाबाद : शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या दृष्टीने काही प्रमुख चौकांत सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. मात्र, मागील अनेक महिन्यांपासून ती बंद असल्याने वाहतूककोंडी होत आहे.

रस्त्याची दुरवस्था

उस्मानाबाद : शहरातील शांतिनिकेतन भागातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारक त्रस्त असून, पालिका प्रशासनाने याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Penalty for driving