तंबाखूजन्य पदार्थाची विक्री ९० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:24 IST2021-01-13T05:24:29+5:302021-01-13T05:24:29+5:30

उस्मानाबाद : तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असतानाही जिल्ह्यातील अनेक दुकाने व पानटपऱ्यांवर खुलेआमपणे विक्री होत होती. तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस ...

Penalties for sale of tobacco products against 90 persons | तंबाखूजन्य पदार्थाची विक्री ९० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाया

तंबाखूजन्य पदार्थाची विक्री ९० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाया

उस्मानाबाद : तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी असतानाही जिल्ह्यातील अनेक दुकाने व पानटपऱ्यांवर खुलेआमपणे विक्री होत होती. तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस आळा बसावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या वतीने धडक मोहीम राबवून ९० जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली. पोलिसांच्या कारवाईमुळे तंबाखूजन्य विक्री करणाऱ्या दुकानदार व टपरीचालकांचे धाबे दणाणले आहे.

तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे मुख व फुप्फुसाच्या कर्करोगासारख्या गंभीर व्याधींनी समाजास ग्रासले असून, व्यसनाधीनता वाढत आहे. या उत्पादनांसंबंधी ‘सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २०१३’ अस्तित्वात आहे. या कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास, १८ वर्षांखालील व्यक्तींना सिगारेट, तंबाखूजन्य उत्पादने विकण्यास, तसेच शैक्षणिक संकुलाच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास मनाई आहे. असे असले तरी अनेक विक्रेते कायद्याची पायमल्ली करत तंबाखूजन्य पदार्थ खुलेआम विक्री करताना आढळून येतात. याला चाप बसावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांंना दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या अनुषंगाने उमरगा, मुरूम, लोहारा, नळदुर्ग, तामलवाडी, तुळजापूर, उस्मानाबाद शहर, आनंदनगर, बेंबळी, ढोकी, येरमाळा, आंबी, वाशी पोलीस ठाण्यांच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी ९० दुकानदार, टपरीचालकांवर कारवाई करून प्रत्येकी २०० रुपयांप्रमाणे १८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Web Title: Penalties for sale of tobacco products against 90 persons