ऑटाेरिक्षाच्या धडकेत पादचाऱ्यासह प्रवासीही ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:29 IST2021-04-26T04:29:20+5:302021-04-26T04:29:20+5:30

उस्मानाबाद - भरधाव ऑटाेरिक्षाने दिलेल्या धडकेत पादचारी जागीच ठार झाला. तसेच सदरील ऑटाेरिक्षा पलटी हाेवून आतील महिला प्रवाशाचा मृत्यू ...

Pedestrians and passengers were killed in the autorickshaw collision | ऑटाेरिक्षाच्या धडकेत पादचाऱ्यासह प्रवासीही ठार

ऑटाेरिक्षाच्या धडकेत पादचाऱ्यासह प्रवासीही ठार

उस्मानाबाद - भरधाव ऑटाेरिक्षाने दिलेल्या धडकेत पादचारी जागीच ठार झाला. तसेच सदरील ऑटाेरिक्षा पलटी हाेवून आतील महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. ही घटना उमरगा तालुक्यातील जकेकूरनजीक राष्ट्रीय महामार्गावर घडली. या प्रकरणी उमरगा पाेलीस ठाण्यात चालकाविरूद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पाेलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, उमरगा तालुक्यातील दाबका येथील चालक युसूफ महेताब पटेल हे २१ एप्रिल राेजी आटाेरिक्षा (क्र. एमएच.२५-एन.१११४) घेऊन जात हाेते. त्यांनी आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणे चालवून रस्ता ओलांडणारे राजेंद्र विश्वनाथ जाधव (वय ४०, रा.जकेकूर) यांना जाेराची धडक दिली. या अपघातात गंभीररित्या जखमी झालेले जाधव यांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघाती घटनेनंतर हा ऑटाेरिक्षा पलटी झाला. यावेळी आतील मल्लवा लक्ष्मण दरेकर (वय ४९, रा. उमरगा), पद्माबाई चव्हाण, रेणुका देवकर (रा. उमरगा) या तिघीजणी जखमी झाल्या. यातील मल्लमा दरेकर यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मयत राजेंद्र जाधव यांचा भाऊ परमेश्वर जाधव यांनी २३ एप्रिल राेजी उमरगा पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ऑटाेरिक्षा चालकाविरूद्ध भादंसंचे कलम २७९, ३०४ (अ), ३३७, ३३८ सह माेटार वाहन कायद्याचे कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उमरगा पाेलीस करीत आहेत.

Web Title: Pedestrians and passengers were killed in the autorickshaw collision