सव्वासात कोटींची देयके थकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:29 IST2021-03-07T04:29:31+5:302021-03-07T04:29:31+5:30

कळंब : उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची ७ कोटी २५ लाख रुपयाची पुरवणी देयके आर्थिक तरतूद ...

Payments of crores are exhausted | सव्वासात कोटींची देयके थकली

सव्वासात कोटींची देयके थकली

कळंब : उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची ७ कोटी २५ लाख रुपयाची पुरवणी देयके आर्थिक तरतूद नसल्यामुळे प्रलंबित आहेत. ती देयके पारित करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (प्रा) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची प्रसुती रजा, आर्जित रजा, वरिष्ठ वेतनश्रेणी फरक, वस्तीशाळेतील शिक्षकांच्या वेतननिश्चती फरक, वैद्यकीय प्रतिपूर्ती, आगाऊ वेतनवाढ फरक, पदोन्नती फरक इत्यादी प्रकारची पुरवणी देयके प्रलंबित आहेत. ही पुरवणी देयके अदा करण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, अशी मागणी संघाने निवेदनाद्वारे केली आहे. या निवेनावर शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, सोमनाथ टकले, एल. बी. पडवळ, संतोष देशपांडे, भक्तराज दिवाने, अशोक जाधव, विठ्ठल माने, श्रीनिवास गलांडे, सुधीर वाघमारे, धनाजी मुळे यांच्या सह्या आहेत.

चौकट.........

तालुकानिहाय थकीत रक्कम

उस्मानाबाद - १ कोटी रुपये, कळंब - १ कोटी ५० लाख, वाशी - ६० लाख, लोहारा -५० लाख, भूम - ६० लाख, परांडा - ३० लाख, तुळजापूर - २ कोटी १५ लाख, उमरगा ६० लाख.

Web Title: Payments of crores are exhausted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.