ऑक्सिजन बेडसाठी रुग्ण, नातेवाइकांची धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:35 AM2021-05-06T04:35:18+5:302021-05-06T04:35:18+5:30

उमरगा : उमरगा तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्यत दिवसेंदिवस वाढ होत आहे, तर मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या ...

Patients, relatives rush for oxygen beds | ऑक्सिजन बेडसाठी रुग्ण, नातेवाइकांची धावाधाव

ऑक्सिजन बेडसाठी रुग्ण, नातेवाइकांची धावाधाव

googlenewsNext

उमरगा : उमरगा तालुक्यातील कोरोना बाधितांच्या संख्यत दिवसेंदिवस वाढ होत आहे, तर मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येतही भर पडत आहे. काेराेनाच्या वाढत्या संसर्गामुळे आता उमरग्यात ऑक्सिजन मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे उस्मानाबाद, साेलापूर, लातूर, आदी ठिकाणी बेडचा शाेध घ्यावा लागत आहे.

उमरगा शहरात एक शासकीय रुग्णालयात व इतर १० कोविड हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील कोविड रुग्णालयात एकूण ३०३ बेडची संख्या आहे. यामध्ये ११० ऑक्सिजन बेड, ४० आयसीयू बेड, १८ व्हेंटिलेटर बेड, तर १५३ साध्या बेडची संख्या आहे. वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन बेड कमी पडू लागले आहेत. परिणामी कोविड रुग्णांना उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, आदी विविध ठिकाणी ऑक्सिजन बेडची शोधाशोध करावी लागत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत.

सध्या उपजिल्हा रुग्णालयात दररोज ६० ऑक्सिजन सिलिंडरची मागणी आहे. मात्र, दररोज ३५ ते ४० सिलिंडर मिळत आहेत. वाढती रुग्णांची संख्या पाहता माेठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज निर्माण होण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णसंख्या व ऑक्सिजनची कमतरता याची दखल घेऊन उपजिल्हा रुग्णालयात एक कोटी १० लाख रुपये खर्च करून निर्माण करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटला मंजुरी मिळाली आहे. मात्र, या ऑक्सिजन प्लांटचे काम अध्याप सुरू झालेले नाही. हे काम तातडीने सुरू करण्याची गरज आहे. तालुक्यात बुधवारी नवीन ६४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली, तर ८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे मृत्यूंची संख्या १७२ झाली आहे.

उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ५ कोरोनाबाधित रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला.

उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे बुधवारी घेण्यात आलेल्या ११४ रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये २४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. उपजिल्हा रुग्णालयातून पाठविलेल्या ५० स्वॅबचे अहवाल आले, त्यात २० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ग्रामीण भागात ५१ रॅपिड अँटिजेन टेस्ट घेण्यात आल्या. यात १२ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तालुक्यात सध्या ६४९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुहास साळुंके यांनी दिली.

Web Title: Patients, relatives rush for oxygen beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.