प्रवाशाच्या कपड्याच्या पिशव्या पळविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:24 IST2021-01-13T05:24:31+5:302021-01-13T05:24:31+5:30

४५६ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उस्मानाबाद : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ४५६ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करून १ लाख १० हजार ९०० ...

The passenger's clothing bags were snatched | प्रवाशाच्या कपड्याच्या पिशव्या पळविल्या

प्रवाशाच्या कपड्याच्या पिशव्या पळविल्या

४५६ वाहनचालकांवर कारवाईचा बडगा

उस्मानाबाद : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ४५६ वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई करून १ लाख १० हजार ९०० रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई शनिवारी जिल्ह्यातल विविध मार्गावर १८ पाेलीस ठाणी व शहर वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आली. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर यापुढेही कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आली.

दुचाकीवरुन दारूची वाहतूक, एकाविरुध्द गुन्हा

उस्मानाबाद : ढोकी पोलीस ठाण्याचे पथक ९ जानेवारी रोजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते. यावेळी पथकास

तेर येथील मंगेश लोमटे दुचाकीवरुन देशी-विदेशी दारुच्या २५ बाटल्या अवैधपणे वाहतूक करत असताना आढळून आला. यावरून पोलीस पथकाने मद्य जप्त करून संबंधिताविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यातंर्गत गुन्हा नोंद केला.

जुन्या भांडणावरून एकाचा दात पाडला

उस्मानाबाद : जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाचा दात पाडल्याची घटना तालुक्यातील कौडगाव (बावी) येथे ८ जानेवारी रोजी घडली.

कौडगाव (बावी) येथील ज्ञानदेव ढेकणे हे आपल्या शेतात काम करीत होते. यावेळी भाऊ तुकाराम ढेकणे याने तेथे येऊन जुन्या भांडणाचा वाद उकरुन ज्ञानदेव ढेकणे यांना लाथाबुक्क्या व काठीने मारहाण केली. यात ज्ञानदेव ढेकणे यांना दात पडला. याप्रकरणी ज्ञानदेव ढेकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.

Web Title: The passenger's clothing bags were snatched